बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (14:39 IST)

कोरोना काळात इओसिनोफिलिया रोगाचा धोका, जाणून घ्या या आजाराचे लक्षण...

कोरोनाच्या संसर्गाच्या दरम्यान शरीराला आजारांच्या धोक्यापासून लांब ठेवणं महत्त्वाचे आहे. अशामध्ये या संक्रमणाच्या काळात इओसिनोफिलीया नावाचा आजार हा पांढऱ्या पेशींच्या असंतुलित होण्यामुळे होतो, आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक असू शकतं. 
 
कारण इओसिनोफिलीया आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि घशात सूज येते. हे लक्षणे सध्या कोरोना विषाणूंची लक्षणे मानली जातात. या व्यतिरिक्त या आजाराचा परिणाम आपल्या मेंदूत देखील होतो. या मुळे मानसिक आजार होण्याचा धोका देखील वाढू शकतो.
 
अशामध्ये आपण शरीरात वाढणाऱ्या इओसिनोफिलीया आजाराचे लक्षण लक्षात ठेवून स्वतः चे रक्षण करू शकतो. या आजारामुळे आपल्या घशात सूज येणं, त्वचेत खाज येणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा श्वासोच्छ्वास सारखे लक्षण दिसून येतात. या मुळे आपल्या शरीरात हृदयरोगाचा धोका अनेक पटीने वाढतो. 
 
स्वतःला या आजारापासून लांब ठेवण्यासाठी साधारण लक्षणे दिसून येत असताना आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. आहारात जंक खाद्य पदार्थ घेणं त्वरित बंद करावे. आपल्याला दररोज पुरेसे पाणी पिणं आवश्यक आहे. कारण यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात हानीप्रद विषारी पदार्थ(टॉक्सिन)जमा होत नाही. ज्यामुळे आपल्या पांढऱ्या रक्त पेशींचे संतुलन चांगले बनून राहत. 
 
आपल्या शरीरात पांढऱ्या रक्तपेशींचे नियंत्रण राखण्यासाठी कांद्याच्या रसाचे सेवन करावं किंवा मेथीला उकळवून त्याच्या पाण्याचे सेवन करणे योग्य असते. परंतु इओसिनोफिलीया गंभीर झाल्यास चिकित्सकांकडून तपासणी जरूर करवून घ्यावी.