शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (09:11 IST)

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, जाणून घेणे आवश्यक

देशात कोरोनाव्हायरसचा थैमान वाढत असताना याची नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाचे काम देखील आव्हात्मक होत चालले आहे. CDC अनुसार आता तीन अजून नवीन लक्षणं असल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
पूर्वी सांगितलेल्या लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला, थकवा तसेच वास न येणे यासारखे बदल झाल्यास ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच समजण्यात येत होते परंतू आता अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. 
 
यानुसार, नाक वाहणे, मळमळ आणि जुलाब होणं ही देखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशात या लक्षणांना दुर्लक्ष न करता कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 
 
नाक वाहणे 
सतत नाक वाहत असून अस्वस्थता जाणवत असल्यास कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला ‍देण्यात येत आहे. याआधी वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षण नाही असं समजलं होतं. 
 
मळमळ होणे
जीव घाबरणे, वारंवार होणाऱ्या मळमळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा व्यक्तीस क्वारंटाईन करुन तपासणी करावी असा सल्ला दिला जात आहे. 
 
जुलाब
जुलाब होणं हे कोरोनाचं नवीन लक्षण समोर आलं आहे. तसं तर कोरोना रुग्णांना जुलाबसारखी लक्षणंदेखील असल्याचं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे जुलाब आणि इतर शारीरिक बदल झाल्यास दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकतं. अशात कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे.