1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (08:40 IST)

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोनावर यशस्वी मात

School Education Minister
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. जनतेचं प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांसोबतच या काळात योग्य आहार, योगसाधना, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यांमुळे लवकर बरं होण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल होऊन कोरोनासाठीचे उपचार घेतले. ज्यानंतर काही दिवसांतच त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली.