शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 23 एप्रिल 2020 (15:55 IST)

सरकारी कर्मचारी, शिक्षकांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळणार

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार असले तरी एप्रिल महिन्याचे वेतन नेहमीप्रमाणे एकाच टप्प्यात देण्यात येईल अशी माहिती राज्य  सरकारकडून देण्यात आली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांबोबर शिक्षकांनाही एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार एकाच टप्प्यात मिळणार आहे.

करोना व्हायरसमुळे मागच्या महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन आहे. एप्रिलचा पूर्ण महिना राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे कर संकलनावर मोठा परिणाम झाला आहे.