1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (22:34 IST)

Story of first corona patient: काय ही महिला पेशंट झिरो म्हणजे जगातील पहिली कोरोना संक्रमित

मागील डिसेंबरपूर्वी जगात कोरोना विषाणू बद्दल कोणालाच माहीत नव्हते. सर्व जग आपल्याच गतीने चालत होतं. चीन देशातील वुहान या भागात एक महिला एका मोठ्या रुग्णालयात आपल्या तापाचं उपचार घेण्यासाठी आली होती. काही दिवसांनी ती बरी होऊन आपल्या घरी परतली. पण तो पर्यंत फार काळ निघून जाऊन उशीर झाला होता. ह्याचे कारण असे की त्या महिलेला ज्या ठिकाणी हा संसर्ग झाला होता, तोपर्यंत तेथे हजारोच्या संख्येत लोकं पोहोचले होते आणि आता संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. 
 
जाणून घ्या या पहिल्या संसर्गाची कहाणी 
आज हजारोच्या संख्येने लोकं मरण पावले आहे. लाखांच्या संख्येने लोकं संक्रमित झाले आहे. इटली, जर्मनी, फ्रांस, स्पेन आणि चीनचा नायनाट करणारा विषाणू हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हायरस समजला जातो. 
 
याचे कारण म्हणजे संसर्गाचा धोका जास्त आहे मृत्यूचा कमी. एकाचे दोन, दोनाचे दहा, दहाचे शंभर, शंभर चे हजार. हा विषाणूंचा संसर्ग एवढ्या झपाट्याने वाढत चालला आहे की आज त्याला थांबवणे अशक्य आहे. ह्याचा परिणाम म्हणूनच आज संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आले आहे.
 
आता या धोकादायक व्हायरसाने बाधित झालेल्या पहिल्या व्यक्तीची ओळख पटली असल्याची बातमी येत आहे. 
 
हन्नान बाजार हे चीनचे एक वर्दळीचे ठिकाण आहे. येथे समुद्री खेकडा आणि माश्यांचा बाजार लागत असतो. येथे बरेच लोकं जमत असतात. खरेदीदार आणि विक्रेते. 
 
वुहानच्या नगरपालिका आयोगाच्या आरोग्य विभागाने असा दावा केला आहे की खेकड्यांची विक्री करणारीही महिला वेई गुजियानच पहिली संक्रमण झालेली रुग्ण आहे.
 
10 डिसेंबर रोजी वेईला सर्दी झाल्याची तक्रार झाली. वुहानमधील स्थानिक क्लिनिकमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आला. किरकोळ ताप असल्याचे सांगून तिला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले पण वेईला अशक्तपणा सतत जाणवत होता म्हणून ती दुसऱ्या रुग्णालयात दाखविण्यास गेली. तरीही तिला काही यश मिळाले नाही. यामुळे ती 16 डिसेंबर रोजी वुहानच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात वुहान युनियन येथे गेली.
 
वुहानच्या मासेबाजारात कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार होतं असल्याची बातमी सर्वत्र पसरल्यावर डॉक्टरांनी त्वरितच वेईला वेगळे ठेवले. ती बरी होऊन जानेवारीत आपल्या घरी परतली. माध्यमांचा अहवालानुसार एका महिन्याच्या उपचारानंतर वेई पूर्णपणे स्वस्थ झाली. नंतर तपासणीतून उघडकीस आले की वेईला हे आजार स्वच्छतागृहापासून लागले आहे. ज्याचा वापर एक मांस व्यापारी करत होता आणि त्याच स्वच्छतागृहाचा वापर वेईने केला होता. त्यानंतर वुहानमधील या समुद्री खाद्य बाजाराला पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. 
 
वेईच कोरोनाचा पेशंट झिरो असल्याचा विश्वास आहे. पण याबद्दल काहीसे स्पष्ट झालेले नाही, कारण चीनच्या प्रसार माध्यमातून कोरोनाचा पहिला रुग्ण म्हणून एका 70 वर्षाच्या व्यक्तीची नोंद झाली आहे.