शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (18:05 IST)

मोठी बातमी , 1 मार्च पासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेत 60 वर्षावरील लोकांना लस मिळेल, खासगी पैसे मोजावे लागतील.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी घोषणा केली की 1 मार्च पासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा  दुसरा टप्पा सुरू होईल. या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे.ते म्हणाले की 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील ही लस दिली जाणार आहे, ज्यांना आधीपासूनच मोठा आजार  आहे.
 
ते म्हणाले की ,सरकारी रुग्णालयात ही लस मोफत असेल. 10  हजार शासकीय आणि 20 हजारांहून अधिक खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण देण्यात येईल. 
 
जावडेकर म्हणाले की ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना या साठी पैसे द्यावे लागतील.ते म्हणाले की आरोग्य मंत्रालय 3 ते 4 दिवसात उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा  करून सांगणार की खासगी रुग्णालयात लस चे किती पैसे द्यावे लागतील.  
हे उल्लेखनीय आहे की कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसी दिल्या गेल्या आहे.