बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , रविवार, 26 एप्रिल 2020 (10:00 IST)

लॉकडाऊनमुळे सुमारे चार कोटी स्थलांतरित मजुरांच्या जीवनावर परिणाम : जागतिक बॅंक

भारतातील जवळपास चार कोटी देशांतर्गत स्थलांतरित मजुरांवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा गंभीर परिणाम झाला आहे, असे जागतिक बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात म्हटले आहे.

भारतात गेला महिनाभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे चार कोटी स्थलांतरित मजुरांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांत ते हजार लोकांनी शहरांतून ग्रामीण भागांत स्थलांतर केले आहे, असे म्हटले आहे. या अहवालानुसार, भारतातील स्थानिक स्थलांतरितांचे हे प्रमाण आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांच्या प्रमाणाच्या अडीच पट इतके आहे.

लॉकडाऊनमुळे नोकरी जाण्याची भीती आणि सामाजिक भेदभाव या कारणांमुळे भारत आणि लॅटीन अमेरिकेतील कित्येक देशांमध्ये अंतर्गत स्थलांतरितांना घरी परतावे लागले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योजलेले हे उपायच खरे म्हणजे याच्या प्रसाराला कारणीभूत ठरले आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

दक्षिण आशियामध्ये आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत अशा दोन्ही स्थलांतरितांवर या करोना संकटाचा परिणाम झाला असून आरोग्य सेवा, रोख पैसे, सामाजिक कार्यक्रम आणि भेदभावाच्या वागणुकीपासून सरकारांनी या अंतर्गत स्थलातरितांचे रक्षण केले पाहिजे, असेही जागतिक बॅंकेने या अहवालात स्पष्ट केले आहे.