शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (09:06 IST)

राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून गुरुवारी ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील  तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ४१३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४८, ठाणे २२, नवी मुंबई मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १३, वसई विरार मनपा १०, रायगड ९, नाशिक १४, जळगाव १५, पुणे ७३, पिंपरी चिंचवड मनपा १९, सातारा २०, कोल्हापूर ३६, सांगली १०, लातूर ११, उस्मानाबाद ९, नागपूर १५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४१३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा ३१, जळगाव ४, पुणे ३, नाशिक ३,पालघर ३, लातूर २, उस्मानाबाद २, रायगड १, वाशिम १ आणि औरंगाबाद १ असे आहेत. गुरुवारी ९,११५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३,९०,९५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले आहे.
 
तपासण्यात आलेल्या २९,७६,०९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,६०,१२६ (१८.८२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,२५,६६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात सध्या ५ लाख ६० हजार १२६ जण कोरोनाबाधित असून यामध्ये १ लाख ४९ हजार ७९८ जण Active रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तर गुरुवारी ९ हजार ११५ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.