रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:10 IST)

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम पाहतात. मागच्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्टही निगेटीव्ह आला होता.
 
अनिकेत आमटे यांनी दिली माहिती, ती  अशी कोरोना चा प्रादुर्भाव परत वाढल्याने प्रकल्प पर्यटकांसाठी बंद. "बाबांना(डॉ.प्रकाश आमटे) गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. RTPCR negative आली. पण ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून  चंद्रपूरला चेक अप केले डॉ.दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना positive असल्याचे स्पष्ट झाले. तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात admit व्हायचा सल्ला दिला.  
 
गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी.