बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (17:12 IST)

सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार

राज्य सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.   
 
प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. कोविड-१९ च्या उपचारात रेमडेसिवीरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटना सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली,' असं राजेश टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.