शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 21 एप्रिल 2020 (10:01 IST)

राजधानी मुंबई व पुण्यातली करोनाची स्थिती झाली अतिशय गंभीर: केंद्र सरकारचे निरीक्षण; पथक येणार पाहणीला

महाराष्ट्रात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई-पुण्यातली करोनाची स्थिती फार गंभीर होत आहे. राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत हे. मात्र आता केंद्र सरकारचे निरीक्षण; पथक पाहणीला येणार आहेत. केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. यानुसार सहा मंत्रिगटाचं हे पथक देशातील चार राज्यांमधील प्रमुख शहरांना भेटी देईल. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन केंद्रीय पथक पाहणीकरेल.  
 
करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये हे पथक भेट देणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचं पालन होतंय की नाही? केंद्र सरकारने लॉकडाउन दरम्यान जे नियम सांगितले आहेत त्यांचं उल्लंघन होत नाही ना? उल्लंघन झाल्याच्या राज्यात किती तक्रारी आहेत या सगळ्याचा आढावा हे पथक घेणार आहे.