सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (16:26 IST)

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार 'या' गोळ्या खरेदी करणार

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार Favipiravir Tablets (फेविकोविड २००) आणि Remdesivir (रेमडेसीवीर) ही औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजशे टोपे यांनी सांगितले की, कोविड-१९ रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी ही औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. 
 
 राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितले की, कोविड -१९च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आम्हाला फेविपिराविर आणि रेमडेसीवीर आणि इतर आवश्यक औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी कराव्या लागतील. ही औषधे महाग आहेत, म्हणूनच राज्य सरकारने ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसीवीर, फेविपिरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.