शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (12:58 IST)

राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.  राज्यात बुधवारी 359 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. यापूर्वी 7 मार्च आणि 2 मार्चला एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 857वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 हजार 9 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
 
राज्यातील ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 19 हजार 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 857 (10.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.