गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (08:35 IST)

राज्यात मंगळवारी 460 नव्या रूग्णांची नोंद

राज्यातील मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी  तुलनेत काहीशी वाढ होताना दिसत आहे. राज्यात  मंगळवारी 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात  5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
 राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत.