शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (09:40 IST)

'लस' हाच कोरोना व्हायरसवर मात करण्याचा मार्ग आहे

देशात कोरोना व्हायरसची साथ रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. लस हाच कोरोना व्हायरसवर मात करण्याचा मार्ग आहे असे सरकारचे मत आहे.
 
“हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना कोरोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
खूप लोक एखाद्या रोगाचा संसर्ग होऊन बरे होतात तेव्हाही त्यांच्यामध्ये त्या रोगाविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होते. पण खूप लोक असं म्हणताना तिथे लोकसंख्येच्या संदर्भात विशिष्ट आकडेवारी अपेक्षित असते. त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतात.
 
मुंबई आणि दिल्ली या मोठया शहरांमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेमध्ये अनेकांना करोनाची बाधा होऊन गेल्याचे समोर आले. दिल्लीत लोकसंख्येच्या एका मोठया गटामध्ये अँटी बॉडीज आढळल्या. म्हणजे तिथे नागरिकांना कोरोनाची लागण झाली आणि ते त्यातून बरे सुद्धा झाले.
 
मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे. निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आलं.