शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जुलै 2021 (23:55 IST)

कोल्हापुरातल्या कोरोना रूग्णसंख्येत घट नाही

महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटीचं सर्वात जास्त प्रमाण कोल्हापूर मध्ये आहे. निर्बंधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 916 लोकांना कोरोनाची बाधा झालीय. तर तब्बल 5 हजार 130 रूग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. वाढत्या मृत्यूदरानं कोल्हापुरकरांची चिंता वाढलीय. 
 
कोल्हापूरमध्ये अजूनही दिवसाला एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय पथकानं काही उपाययोजनादेखील सुचवल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोल्हापुरातल्या रूग्णसंख्येत घट झालेली नाही.