बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (08:33 IST)

राज्यात 1.04 लाख सक्रिय रुग्ण; 7,243 नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी 7 हजार 243 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर, 10 हजार 978 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या 1 लाख 04 हजार 406 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 72 हजार 645 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 38 हजार 734 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.21 टक्के एवढा झाला आहे.

महाराष्ट्रात आज 196 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 1 लाख 26 हजार 220 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 43 लाख 83 हजार 113 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 463 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 6070 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.