सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (14:41 IST)

या चुकांमुळे माइल्ड संक्रमण धोकादायक होऊ शकतं, दुर्लक्ष करु नका

कोरोना व्हायरस संसर्गात आजाराबद्दल लवकरात लवकर माहित पडणे आणि वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. अनेकदा कोविड-19 टेस्ट रिर्पोट निगेटिव्ह आल्यावर देखील प्रकरण गंभीर होत जातं. जरासं दुर्लक्ष केल्यावर लक्षणं अचानक गंभीर होऊ शकतात. अशात लक्षणांमध्ये हलका बदल देखील ट्रॅक करुन काळजी घेणे आवश्यक आहे. 
 
या प्रकारे बिघडतात केस
कोविड19 चे सामान्यत: हलक्या लक्षणांपासून सुरु होतं. रुग्णाच्या शरीरात म्यूटेंट स्ट्रेन विकास व जटिलता वाढल्याने संक्रमण गंभीर रुप धारण करु शकतो. अशात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते.
 
एक्सपर्टप्रमाणे कोविड 19 मध्ये सायकोटाइन, हॅप्पी हायपोक्सिया देखील एक गंभीर कारण असू शकतं ज्याने कमी वेळात गंभीर स्थिती निर्मित होऊ शकते. डॉक्टर्सप्रमाणे रुग्णांनी पहिल्या दिवसापासूनचं यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करावे. कोविड लक्षणं दिसू लागल्या याकडे दुर्लक्ष करु नये. आता जाणून घ्या त्या फॅक्टर्सबद्दल ज्यामुळे रुग्णांमध्ये रिकव्हरीदरम्यान हलके लक्षणं देखील गंभीर होण्याची शक्यता नाकारात येणार नाही-
 
लक्षणांकडे दुर्लक्ष करणे- इंफेक्शनला दुर्लक्ष करणे ही मोठी चूक सिद्ध होऊ शकते. असामान्य किंवा गंभीर लक्षणांकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. यावर उपचार कधीही अलॅर्जिक रिएक्शन किंवा व्हायरल समजण्याची चूक करु नये.
 
जर शरीरात संदिग्ध लक्षणं दिसत असतील किमान एकदा कोविड 19 टेस्ट करावं. वेळेवर इंफेक्शनबद्दल माहित पडल्यावर दुसर्‍या लोकांना यापासून वाचवता येऊ शकतं. शरीरात दिसत असलेले लक्षणं समजून डॉक्टरांच्या सल्ल्यावर उपचार घ्यावा.
 
स्टिरॉयड- इन्फ्लेमेशन आणि गंभीरता कमी करण्यासाठी अनेकदा रुग्णालयात दाखल करुन रुग्णांना स्टिरॉयड दिलं जातं. तसं तर कोविड 19 मध्ये स्टिरॉयड देण्याची आवश्यकता नसते. याचा अती वापर हलके लक्षण असलेल्या रुग्णांवर गंभीर परिणाम करु शकतं. कोरोनाच्या रुग्णांनी घरात रिकव्हरीवर लक्ष द्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध वापरावी.
 
डॉक्टरर्सचा दावा आहे की कोरोनाच्या उपचारात स्टिरॉयडचा वापर गंभीर समस्या उत्पन्न करु शकतात. एक्सपर्ट्सप्रमाणे म्युकोमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस इंफेक्शन देखील स्टिरॉयडच्या चुकीच्या वापरमुळे होऊ शकतं. भारतात याचे अनेक प्रकरण बघायला मिळत आहे.
 
कोविड स्पेशलिस्टचा सल्ला-
रिकव्हरी दरम्यान मोठी चूक म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर्सचा सल्ला न घेणे. एक योग्य डॉक्टरच आपल्या योग्य औषध आणि लक्षणं गांर्भीयतेने कमी करण्यास मदत करतं. 
 
टेस्टिंगमध्ये उशीर-
इंफेक्शनचा नेचर आणि लक्षणांचे पॅटर्न यात तालमेल बसत नसल्यामुळे अनेकदा लोकं उशिरा टेस्ट करवत आहे ज्यामुळे रिकव्हरी प्रभावित होते. टेस्टिंगमध्ये बेपरवाई केल्याने आरोग्य अजून बिघडतं म्हणून लक्षणं बघून टेस्ट नक्की करावी. जर आपण टेस्ट करवत नसाल तर सेल्फ आयसोलेशनमध्ये स्वत:ची काळजी घ्या.
 
याकडे दुर्लक्ष करु नका-
कोविड 19 रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे SPO2 लेवल आणि ता तसंच इतर आवश्यक लेवल मॉनिटर करणे. जर आपलं ऑक्सिजन लेवल 92 टक्क्यांहून खाली पडत असेल तर तसंच सात दिवसांनंतर ही ताप कमी होत नसेल तर धोका वाढू शकतो. हाय बीपी किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करु नये.