मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (19:19 IST)

सिंगापूर व्हेरियंट ची तिसरी लाट मुलांवर परिणाम करू शकते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की सिंगापूरमधील नवीन स्ट्रेनमुळे भारतातील कोरोना संसर्गाची तिसरी लाट निर्माण होऊ शकते आणि यामुळे मुलांवर त्याचे अधिक परिणाम होईल. सिंगापूरहून विमानांची आवाजाही थांबवावी,असे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले आहे. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी ही भीती व्यक्त केल्यापासून पालकांची चिंता वाढली आहे कारण नवीन स्ट्रेन मुलांवर अधिक परिणाम करीत आहे. सिंगापूरने प्रथम जगाला सतर्क केले आहे.
कोरोना महामारीची सुरूवात झाल्यापासून, हा संसर्गजन्य विषाणू बर्‍याच वेळाआपले रूप बदलत आहे.  हा विषाणू सहसा वृद्ध आणि इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर झडप घालत आहे. परंतु सिंगापूरमध्ये जो नवीन स्ट्रेन  सापडला आहे त्याचा परिणाम मुलांवर अधिक होत आहे. रविवारीच सिंगापूरने नवीन स्ट्रेन बाबत चेतावणी बजावत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.  
सिंगापूरचे शिक्षणमंत्री चन चुन सिंग यांनी सांगितले की, "काही (व्हायरस) चे म्यूटेन जास्त आक्रमक आहेत आणि असे दिसत आहे  की ते अधिक लहान मुलांवर हल्ला करतात." त्यांनी हे देखील सांगितले आहे की ज्या मुलांमध्ये हे लक्षणे आढळली आहेत ते गंभीररीत्या आजारी नाही काहींना तर सौम्य लक्षणे आहेत. 
रविवारी सिंगापूरमध्ये सप्टेंबरच्या मध्यापासून सर्वाधिक 38 प्रकरणे नोंदल्या गेल्या असून त्यापैकी 17 प्रकरणे एकमेकांशी संबंधित नाहीत. संसर्ग झालेल्यांमध्ये 4 मुलेही आहेत, जे शिकवणी केंद्रात शिकतात. आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी वैद्यकीय सेवा संचालक केनेथ माक यांचा हवाला देत म्हटले आहे की बी 1617 चा स्ट्रेन मुलांवर अधिक परिणाम करीत आहे. अद्याप किती मुलांना संक्रमण  झाले आहे हे स्पष्ट झाले नाही. 
सिंगापूरमध्ये गेल्या वर्षी 61 हजार लोकांना संसर्ग झाला आणि 31 लोकांचा मृत्यू झाला होता. बर्‍याच महिन्यांपासून संसर्गाची एकही प्रकरणे आढळली नाही. परंतु येथे आता दुसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुमारे 57 लाख लोकसंख्येच्या आशियातील व्यापार केंद्रात संक्रमित होणाऱ्याच्या  संख्येत होणाऱ्या वाढीच्या घटनांना बघता चैन म्हणाले की, हालचालींमध्ये व्यत्यय आणण्याची गरज असू शकते. 
 
एनआयटीआय आयोगाचे भारत सरकारचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल सिंगापूरच्या स्ट्रेन बद्दल म्हणाले की, "मुलांमध्ये कोरोना संसर्गासंबंधी विविध प्रकारांविषयी आलेल्या अहवालांची आम्ही तपासणी करीत आहोत." दिलासादायक बाब ही आहे की हा संसर्ग  गंभीर होत नाही. आम्ही त्यावर दृष्टी ठेवून आहोत.