मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 18 मे 2021 (09:28 IST)

Covid-19 in children: मुलांमध्ये कोरोना व्हायरसचे लक्षणं, घरी या प्रकारे घ्या काळजी

भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. डॉक्टर्सप्रमाणे मुलांमध्ये कोरोना व्हायरसचे लक्षणं ‍दिसून येत नाहीये किंवा अगदी कमी प्रमाणात कळून येताय. अशात आवश्यक आहे की मुलांमधील व्हायरसचे लक्षणं ओळखून वेळेवर त्यावर उपचार करणे ज्यामुळे गंभीर स्वरुपासून वाचता येऊ शकतं.
 
केंद्र सरकारच्या ट्विटर हँडल MyGovIndia वर या संबंधी माहिती शेअर करण्यात आली आहे. हेल्थ एक्सर्पट्सप्रमाणे कोविड- 19 मुळे प्रभावित अनेक मुलांमध्ये सामान्यत: हलका ताप, खोकला, सर्दी, श्वास घेयला त्रास, थकवा, गळ्यात घवघव, जुलाब, जेवण्यात स्वाद न येणं, कमी गंध क्षमता, स्नायू वेदना, सतत नाक वाहणे असे लक्षणं सामील आहेत. या व्यतिरिक्त पोट आणि आतड्यांसंबंधी समस्यांसह काही विलक्षण लक्षणे देखील मुलांमध्ये दिसली आहेत.
 
संशोधनानुसार, मुलांमध्ये मल्टी सिस्टम इनफ्लॅमेटरी सिंड्रोम नावाचे नवीन सिंड्रोम देखील दिसून आले आहे. हा एक रोग नाही तर एक लक्षण आधारित आहे. असे म्हटले जाते की कोविड -19 संसर्ग झालेल्या बहुतेक मुलांना सौम्य ताप, सर्दी, अतिसार इत्यादीसारखी सामान्य लक्षणे आढळतात. परंतु मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम याने ग्रसित मुलांमध्ये हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, पाचक प्रणाली, मेंदूत, त्वचा किंवा डोळ्यांमध्ये संक्रमण आणि सूज दिसून आली आहे.

मुलांमध्ये मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम चे सामान्य लक्षणं जसे सतत ताप येणं, उलटी, पोट दुखणं, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा, हृदयाचे ठोके वाढणे, डोळ्यातलालसरपणा, ओठांवर सूज येणे, हाता-पायावर सूज येणे, डोकेदुखी, शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गाठी तयार होणे सामील आहे.
 
तथापि, घरात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास मुलास संसर्ग होण्याची चिन्हे दिसत नसली तरीही त्यांची तपासणी केली जाणे महत्वाचे आहे. याप्रकारे मुलं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळून येईल. मुलांमध्ये सामान्य लक्षणं जसे, घसा खवखणे, खोकला, स्नायू दुखणे किंवा पोटाची समस्या असल्यास तपासणीची गरज नाही. अशा मुलांवर होम आयसोलेशनमध्ये घरातच उपचार केला जाऊ शकतो.
 
याशिवाय फुफ्फुसांची समस्या, हृदयरोग, क्रॉनिक ऑर्गन डिस्फंक्शन आणि लठ्ठपणा यासारख्या समस्या देखील घरी मॅनजे केल्या जाऊ शकतात. डॉक्टर्सप्रमाणे मुलांना ताप आल्यावर प्रत्येक चार ते सहा तासामध्ये पॅरासिटामॉल 10-15 एमजी/केजी डोस घेतले जाऊ शकतात. जर घसा खवखवणे किंवा कफ होत असेल तर मुले व तरुण दोघेही गरम पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या करू शकतात. मुलांना ओरल रीहाइड्रेशन सॉल्यूशन आणि पोषक तत्वांने भरपूर आहार द्यायला हवा.