शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (18:33 IST)

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक,केंद्र सरकार

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची गती कमी होत असतानाही तिसरी लहर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट ने चिंता व्यक्त केली आहे आणि तज्ञ म्हणतात की यामुळे तिसरी लहर येऊ शकते.
 
अशा परिस्थितीत सर्वात मोठा धोका महाराष्ट्रावर आहे. कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात 50 लाख लोकांना संक्रमित करू शकते आणि या 10 टक्के पैकी म्हणजे 5 लाख मुले असू शकतात. एवढेच नव्हे तर तिसर्‍या लाटे दरम्यान राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या 8 लाखांपर्यंत पोहोचू शकते. 
 
शुक्रवारी सीएम उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी संबंधित नवीन नियमांची घोषणा करण्यापूर्वीच तज्ज्ञ आणि टास्क फोर्सशी या शंकांबद्दल चर्चा केली आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले, "सुमारे पाच लाख मुलांना संसर्ग होऊ शकतो आणि या पैकी अडीच लाख मुलांना सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते." या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
 

महाराष्ट्रावर एवढा धोका का?
 
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका का आहे. ते म्हणाले , 'जेव्हा विषाणू शरीरात त्याच्या प्रती बनवतात, तेव्हा तो दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्यात काही बदल घडवून आणतात.' ते म्हणाले की कोरोना लाटांचे आगमन ही चिंतेची बाब नाही परंतु आपण आपल्या निष्काळजीपणाच्या वागण्याने लाटा गंभीर होऊ दिल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे.
 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका 
 
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप संसर्ग दर 5 टक्क्यांच्या वर आहे, ही चिंताजनक बाब आहे.या जिल्ह्यांमध्ये रायगड,सांगली, सिंधुदुर्ग,सातारा,पुणे,रत्नागिरी,कोल्हापूर,पालघर आणि उस्मानाबादचा समावेश आहे.ते म्हणाले की,राज्यात पुन्हा बंदी घालण्याचे निर्णय घेणे चांगले आहे.
 

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट
 
 महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट चे एप्रिल महिन्यात प्रथम प्रकरण आढळले असून, हा व्हेरियंट राज्यात बराच काळा पासून असल्याचे समजले आहे. तथापि, आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून या व्हेरिएंटने  संक्रमित झालेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेचे शुक्रवारी मृत्यू झाले.