गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (21:08 IST)

सर्वांसाठी लस केंद्र सरकारने 44 कोटी लसींचे ऑर्डर दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला दिलेल्या भाषणात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस मोफत देण्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर लसीची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारच्या खांद्यावर आली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे.  21 जूनपासून देशातील सर्व प्रौढांना केंद्राकडून लस दिली जाणार आहे. यासाठी लसीचे ऑर्डर मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहेत.
 
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हीशील्ड च्या 25 कोटी डोस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आणि कोव्हॅक्सिनच्या 19 कोटी डोस भारत बायोटेकला देण्याचे ऑर्डर  दिले आहेत. कोविड 19 साठी   लसींचे हे  44 कोटी (25 + 19 कोटी) डोस आतापासून डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असतील.
 
या व्यतिरिक्त, कोविड च्या दोन्ही लसींच्या खरेदीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना 30 टक्के आगाऊ रक्कम देण्यात आली आहे.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार या 'सरकारच्या समग्र दृष्टिकोनांतर्गत' 16 जानेवारीपासून प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठबळ देत आहे. केंद्राला प्राप्त झालेल्या विविध ज्ञापनांच्या आधारे, लसीकरण करण्याच्या धोरणाचा तिसरा टप्पा 18 वर्षांवरील सर्व प्रौढांसाठी 1 मे रोजी सुरू करण्यात आला.
 
“आता देशभर लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक सरकारी आरोग्य केंद्रांवर कोविड लस विनामूल्य डोस घेऊ शकतात,” असे अधिकारी म्हणाले.