अरे बाप रे ! आता पुण्यात देखील पाण्यात कोरोना आढळला
पुणे सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव जरी कमी झाले असले तरी ही कोरोना विषाणू चा धोका अद्याप टळलेला नाही.सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर कहरच केले होते. तर सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोरोनाचा विषाणू हा पृष्ठभागेतून नव्हे तर हवेतून देखील पसरतो.हे सिद्ध झाले आहे.
आता सांडपाण्यात देखील कोरोना विषाणू आढळला आहे.पुण्यात आज सांडपाण्यातून कोरोना विषाणू आढळल्याची माहिती मिळाली आहे.पुणे महापालिका आणि नेशनल केमिकल लॅबोरेटरी यांनी पुण्यातील सांडपाण्यातील काही नमुने घेतले आणि त्यावर चाचण्या केल्या तर त्यांना या सांडपाण्यात कोरोना विषाणू असल्याचे आढळले.
ही चाचणी त्यांनी आरटीक्यू पीसीआर पद्धतीने केली.आणि त्या चाचणीतून त्यांना त्या सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळले अशी माहिती प्रकल्पाचे समन्व्यक शास्त्रज्ञ दर.महेश धरणे यांनी सांगितली आहे.या पूर्वी काही दिवसांपूर्वी लखनौ मध्ये देखील सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू सापडल्याचे वृत्त दिले होते.आज हा प्रकार पुणे येथे देखील घडला आहे.