पुण्यातील सेनेटाईझर कंपनीत भीषण अग्निकांड 18 मृतदेह बाहेर काढले गेले
पुणेच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे औद्योगिक परिसरातील एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजीस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागण्याची घटना आज दिनांक 7 जून सोमवारी दुपारच्या वेळेस घडली.या घटनेत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यात महिला कामगारांचे प्रमाण जास्त आहे.अद्याप कामगारांचे शोधकार्य सुरु आहे.
आज दुपारी ही आग पिरंगुट जवळ उरवडे औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजीस ही रासायनिक कंपनीत लागली.या कंपनीत सेनेटायझर बनवले जाते.दुपारच्या वेळी आग लागली त्यावेळी कंपनीत सुमारे 37 कामगार काम करत होते.आग लागलातच त्याने रौद्ररूप धारण केले आणि एका क्षणातच आग पसरली आणि या आगीत 37 पैकी 17 कामगार बेपत्ता झाले.
माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळीच दाखल झाले.काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. या दरम्यान या आगीतून सुमारे 18 मृतदेह काढण्यात आले.अद्यापही शोधकार्य सुरु आहे.
या कंपनीत महिला कामगारांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवून कुलींगचे काम सुरु आहे.