मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (09:30 IST)

काय म्हणता, वाघाला झाली कोरोनाची लागण

न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयातील वाघाला करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या कृषी विभाग राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या प्राण्याला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. चार महिन्यांच्या या वाघिणीला प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यामुळे करोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्राण्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या या कर्मचाऱ्याला नुकतीच करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. १६ मार्चपासून प्राणीसंग्रहालय पूर्णपणे बंद आहे.
 
प्राणीसंग्रहालयातील पाच वाघ आणि सिहांमध्ये करोनाची लक्षणं आढळू लागल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. वाघिणीसोबत इतर तीन वाघ तीन अफ्रिकन सिंहांना कोरडी सर्दी झाली असून लवकरच त्यांची प्रकृती सुधारेल असं प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं आहे.