रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (07:10 IST)

आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करणार आहेत. यावेळी देशातल्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
corona modi
गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहू शकतात. देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासूनची ही पाचवी बैठक असेल. 

दरम्यान, मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांची बैठक घेतली. वंदे भारत योजनेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी राज्यांनी केलेल्या सहकार्याची तसंच आत्तापर्यंत ३५० हून अधिक विशेष श्रमिक रेल्वेमधून सुमारे साडेतीन लाख स्थलांतरित मजूर घरी परतल्याची माहिती गौबा यांनी बैठकीत दिली. मजूरांसाठी आणखी श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. डॉक्टर्स, नर्सेस आणि कोरोना वॉरियर्सना सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यावर गौबा यांनी भर दिला.