मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:31 IST)

धक्कादायक ! साहित्य संमेलनात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह

two-corona
नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून पुणे येथून आलेल्या दोन प्रकाशक कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. भुजबळ नॉलेज सिटी च्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक करोना बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.
 
या दोन व्यक्तींना त्यांची तयारी असल्यास बिटको रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जाणार असून नसल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. यातील एक जण पिंपरी चा तर दुसरा आळंदी येथील आहे.