शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (10:07 IST)

धक्कादायक !महाराष्ट्रात विदेशातून आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात गेल्याकाही दिवसांत परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना पॅाझिटिव्ह प्रवाशांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे.
यातील 12 नमुने पुण्याच्या NIV मध्ये तर 16 नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तपासणी पाठवण्यात आले आहे.
मुंबंई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॅा. मंगला गोमारे सांगतात, "2 डिसेंबरला एअरपोर्टवर 485 लोकांची चाचणी करण्यात आली. यात 9 प्रवासी कोरोना पॅाझिटिव्ह असल्याचं आढळून आलं."
महाराष्ट्र सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली.
या तपासणीत आत्यापर्यंत 9 प्रवासी पॅाझिटिव्ह सापडले आहेत. यातील एक प्रवासी दक्षिण अफ्रिका तर तीन प्रवासी लंडनवरून आले होते.
या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आली नाही अशी माहिती अघिकाऱ्यांनी दिलीआहे.