गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (19:43 IST)

धक्कादायक बातमी ! ओमिक्रॉन देशात पसरू लागला, दक्षिण आफ्रिकेतून दुबई-दिल्ली मार्गे मुंबईत परतलेली व्यक्ती ओमिक्रॉन व्हेरियंट संक्रमित

Shocking news! Omicron spreads across the country
देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. देशातील तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 4 प्रकरणे समोर आली आहेत. याआधी आज गुजरातमधील जामनगरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला या व्हेरियंट चा त्रास झाल्याचे आढळून आले आहे, तर कर्नाटकमध्ये दोन प्रकरणे आढळून आली आहेत.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रहिवासी असलेली ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून दुबई, दिल्लीमार्गे मुंबईत आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले, त्यानंतर ती व्यक्ती ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित आढळली. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या संचालकांनी सांगितले की, परदेशातून मुंबईजवळील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पोहोचलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले.