सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 14 मार्च 2022 (16:13 IST)

Child Vaccination: आता 12 ते 14 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होणार, 60+ ला प्रिकॉशन डोज

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू होईल. ते म्हणाले की, आता देशातील 60 वर्षांवरील सर्व लोकांना अँटी-कोविड-19 लसींचा सावधगिरीचा डोस दिला जाईल. पूर्वी हा डोस फक्त या वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दिला जात होता. 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना हैद्राबाद स्थित 'बायोलॉजिकल इव्हान्स'ने निर्मित अँटी-कोविड-19 लस 'कोर्बेवॅक्स'चा डोस दिला जाईल.
 
मांडविया यांनी कु वर लिहिले, "मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे. मला कळविण्यात आनंद होत आहे की 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू होत आहे. तसेच, 60 वर्षांवरील सर्व लोक आता प्रिकॉशन डोज घेऊ शकतील. मी मुलांचे कुटुंब आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन करतो.
 
एका निवेदनात, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने वैज्ञानिक संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर, 12-13 वर्षे आणि 13-14 वर्षे वयोगटातील (2008 ते 2010 मध्ये जन्मलेल्या) मुलांसाठी अँटी-कोविड-19 लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.