शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:37 IST)

राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची कमी झालेली आकडेवारी  काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात गुरुवारी ४५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर  मृत्यूसंख्या देखील वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील २ दिवसात राज्यात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती परंतु गुरुवारी राज्यात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा सध्या १.८२ टक्के इतका आहे. असले तरी राज्यात काळजी करण्याचे कारण नाही. कारण बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
 
राज्यात गुरुवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७७ लाख १९ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्याच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २ हजार ९६३ इतकी आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात सध्या २२ हजार २३५ व्यक्ती या होम क्वारंटाइन असून ५९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.