मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 28 जून 2021 (08:00 IST)

सोमवारी लसीकरण सुरु; 66 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर एका केंद्रावर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी लसीकरण सुरु आहे. शहरात सोमवारी 16 केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना तर 50 केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ‘कोविशील्ड’ लस मिळणार आहे. एका केंद्रावर ‘कोव्हॅक्सीन’ लस मिळणार आहे.
 
यासाठी केंद्रांवर सकाळी 9 वाजता टोकन वाटप सुरु होईल. दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.
 
सोमवारी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 16 कोविड 19 लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत मिळणार आहे.
 
सोमवारी ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा 18 वर्षापुढील सर्व लाभार्थींना फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत देण्यात येणार आहे. या केंद्रावर 200 लाभार्थी क्षमता आहे.
 
सोमवारी फक्त वय 45 वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस (पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे 84 दिवसानंतर ते 112 दिवसपर्यंत) 50 लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे. सर्व वयोगटामधील कोविन अ‍ॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या 10 टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणाऱ्या 90 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.