सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (12:30 IST)

अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या

अमरावतीच्या तिवसा शहरात अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आशीर्वाद वाईन बार समोर शिवसेना प्रमुख अमोल पाटील यांची सशस्त्र घेतलेल्या काही लोकांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून हत्या केल्याची हृदयविदारक घटना घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज रात्री 10:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे तिवसा शिवसेना प्रमुख अमोल पाटील वय वर्ष 34 यांच्या वर 5 अज्ञात मारेकरीनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अमोल यांना जागीच ठार केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार अमोल हे आपल्या मित्रसामवेत आशीर्वाद वाईन बार मध्ये आले पण बार बंद असल्यामुळे ते बारच्या बाहेरच बसले होते. हे बघून 5 शस्त्रधारी लोकांनी त्यांचा डोळ्यात मिरचीची पूड घातली आणि त्यांच्या डोक्यावर वार केले या हल्ल्यात अमोल जागीच ठार झाले.     
 
घटने ची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून शनिवारी रात्री 4 आरोपीना अटक केली आहे.5 पैकी 1 आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगत आहे.अमोल यांची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्याचे सांगितले जात आहे.