बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (16:20 IST)

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना खरंच चार लाख रुपये मिळणार का ? व्हायरल मेसेजचं सत्य

कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनाच्या वतीने ४ लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या मेसेजसोबत एक बनावट अर्जही असून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे सांगितले जात आहे. मात्र आर्थिक मदतीचा सोशल मीडियावरील मेसेज खोटा आहे.नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.खोट्या मेसेजमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीबाबत नागरिकांकडून चौकशी केली जात आहे.मेसेजबरोबर यासाठीचा बनावट अर्ज देण्यात आला आहे. हा अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे मृतांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असून बनावट मेसेसमुळे नागरिकांची आर्थिक फसणवूक होण्याचीदेखील शक्यता निर्माण झाली झाली आहे.