शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (09:52 IST)

झायडस कॅडिला कोरोना लशीची किंमत कमी करणार

Zydus will reduce the price of Cadillac Corona vaccine झायडस कॅडिला कोरोना लशीची किंमत कमी करणारMaharashtra News Coronavirus News In Marathi  Webdunia Marathi
झायडस कॅडिला ही कंपनी कोरोना लशींची किंमत कमी करण्यास तयार झाली आहे. यामुळे कंपनीच्या कोरोना लशीची किंमत प्रती डोस 265 रुपये इतकी असेल.
भारत सरकार आणि कंपनी यामध्ये सातत्यानं झालेल्या वाटाघाटीनंतर ही बाब समोर आली आहे. असं असलं तरी यावर अद्याप शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.
 
ऑगस्टमध्ये भारतात झायडस कॅडिला लशीला परवानगी देण्यात आली. ही लस 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार आहे. तसंच, झायडस कॅडिलाचे तीन डोस असून, ते इंजेक्शन शिवाय देता येईल.