गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

दत्ताचे 24 गुरु

सूर्य- ज्याप्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसीच आत्माही एकच आहे, परंतू तिचे अनेक रूप बघायला मिळतात. तसेच सूर्य जलाचा संचय करून परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त संचय करून सर्वांना त्यांचा लाभ द्यावा.
 
पृथ्वी- पृथ्वीने आम्ही सहनशीलता व परोपकाराची भावना शिकू शकतो.
पिंगला वेश्या- दत्ताने पिंगला नावाच्या वैश्याहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पेश्यासाठी जगू नाही. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला. तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पेश्यात नाही परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली.
 
कबूतर- देवाने जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलांना जाळेत अडकलेलं बघून स्वत:ही जाळेत जाऊन फसलं, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अती स्नेह दुःखाचे कारण असतं.
 
वायू- जसे जागा चांगली असो या वाईट, वायूचे मूल रूप स्वच्छताच आहे, तसेच आमच्यासोबत चांगले लोकं असो वा वाईट आम्हाला आपला चांगुलपणा सोडायला नको.
 
मृग- मृग आपल्या मस्तीत क्षुब्ध होऊन इतका धुंद होऊन जातो की त्याला मस्तीत तो आपले प्राण परस्वाधीन करतो. याने ही शिक्षा मिळते की कधीच मोहात अडकून बेपर्वा होऊन नाही.
 
समुद्र- समुद्रच्या लाटा निरंतर गतिशील असतात, तसेच जीवनातील चढ- उतारात आम्हाला खूश आणि गतिशील राहायला हवे.
 
पतंगा- जसे पतंगा आगीकडे आकर्षित होऊन जळून जातो, तसेच रंग-रूपाच्या आकर्षण आणि खोट्या मोहात अडकले न पाहिजे.

हत्ती- जसं काष्ठाच्या हत्तिणी सन्निध येण्यासाठी हत्ती विषयसुखलालसेने लुब्ध होऊन खड्ड्यात पडतो आणि सहजपणे मनुष्याच्या हातात सापडतो त्यापासून हे शिकण्यासारखे आहे की तपस्वी पुरुषाने आणि संन्यासी स्त्रीने दूर राहिले पाहिजे.
 
आकाश- प्रत्येक परिस्थिती आणि काळात मोहापासून दूर राहण्याची शिक्षा आकाशाकडून मिळते.
 
पाणी- मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहावे.
 
मधमाशी- मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतू एक दिवस मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. याने शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे योग्य नाही.
 
मत्स्य- लोखंडाच्या गळाला मांस पाहून जशी मासोळी भुलल्यामुळे मांस खायले जाते आणि आपल्या प्राणास मुकते त्याचप्रमाणे आम्हाला जिव्हेच्या स्वादाला अधिक महत्त्व द्यायला नको. आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घ्यावा.
 
टिटवी- ज्याप्रकारे एक टिटवी चोचीत मासा धरून असते आणि ते पाहून इतर पक्षी ते मास हिसकवण्याचा प्रयत्न करतात, आणि शेवटी मासाचा तुकडा सोडल्यावरच तिला शांती मिळते. तसेच आम्हाला स्वत:कडे अधिक वस्तू संजय करून ठेवण्याचा अट्टहास करायला नको.
 
बालक- जसे लहान मुलं चिंतामुक्त आणि प्रसन्न दिसतात तसेच आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
 
अग्नी- परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीत स्वत:ला समायोजित करणे योग्य ठरतं.

चंद्र- जसे चंद्राला अमावास्या आणि पौर्णिमा आल्यावरही अर्थात कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार त्याला बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
 
कुमारिका- देवाने बघितले की एकदा एक कुमारिका धान्य कुटत होती. तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते. बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक-एक बांगडी राहू दिली. नंतर कुमारिकेने आवाज केल्याविना धान्य कुटून घेतले अर्थात आम्हालाही एका बांगडीप्रमाणे एकटे आणि निरंतर वाढत राहण्याची प्रवृत्तीसह जगायला हवं.
 
तीर तयार करणारा कारागीर- दत्त देवाने एक असा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग्न होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्ष वेधीत झाले नाही. अत: आम्हाला अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करावे.
 
साप- देवाने सापाकडून ही शिकले की संन्यासीसारखे जगावे. जसे दोन साप कधीही एकत्र फिरत नाही तसेच दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये. कोणत्याही एका जागेवर न थांबता इकडे- तिकडे विचरण करत ज्ञानाचा प्रसार करावा. 
 
कोळी- कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करतो आणि त्या घरास गिळून मोकळा होता, तसेच ईश्वर मायेने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा नाश करतो. अर्थातच जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये.
 
भ्रमरकीट- भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारा त्याला पावतो.
 
भ्रमर- सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.
 
भुंगा- याकडून देवाने शिकले की जिथे सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काल ग्रहण कराव्या, ज्याप्रकारे भुंगा वेगवेगळ्या फुलांतून पराग घेतो.
 
अजगर- अजगराकडून हे शिकायला मिळाले की जीवनात संतोषी बनून राहावे. जे मिळेल ते सुखसमाधाने स्वीकार करणेच आपले धर्म समजावे.