1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2016 (10:35 IST)

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

datta jayanti
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरू केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरू करून, हा देह क्षणभंगुर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले.
 
दत्ताचा पहिला अवतार 
'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार व 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच 'माणिकप्रभू' तिसरे व 'श्री स्वामी सर्मथ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे 'नेमिनाथ' म्हणून पाहतात आणि मुसलमान 'फकिरा'च्या वेशात पाहतात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्‍वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत.