बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (16:12 IST)

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ता जिथं तुझा वास

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ता जिथं तुझा वास,
पावन झाले ते ते स्थळ, जणू आशीर्वाद आम्हास,
जाता "त्या"स्थळी  आम्ही सकळ दर्शनास,  
सर्वच बाधांचा समूळ होतो की रे सर्वनाश,
रूपे तुझीच   सर्वठायी कित्तीतरी आहे रे देवा,
आठवावे कोणते ही, करावया तुझी सेवा,
औदुंबरा चे ठायी असतो तुझा वास,
भक्त घेती दर्शन त्याचे, करिती उपवास,
नित्य पायावर तुझ्या   नमवुनी या शीर,
माझीया मनाला , खूप मिळत असें धीर,
गळून पडो  माझा अहंकार तुझीया ठायी,
द्यावा आश्रय मजला तुझ्याच रे पायी.
...अश्विनी थत्ते