रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (13:28 IST)

Datta Jayanti 2022 दत्त जयंती कशी साजरी करावी?

यंदा 7 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे.
 
दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटतात. या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली देवता दत्तात्रेय यांच्या जन्मदिवस उत्सव या दिवशी साजरा करतात.
 
सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त गुरु मानले जातात. दत्ताची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते.
 
दत्त जयंती पूजन विधी
चौरंग मांडून त्यावर लाल कपडा घालावा. त्यावर श्री दत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्री दत्ताचे आवाहन करावे. एक तांबा भरुन पाणी जवळ ठेवावे. उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्या अक्षदा घेऊन या मंत्राचे उच्चारण करावे-
ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।
 
त्यानंतर फुल आणि अक्षता अर्पण करुन या मंत्राचे उच्चारण करावे-
जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम।
सर्व रोग हरं देव, दत्तात्रेयमहं भज॥
 
मग श्री दत्ताची पूजा, धूप, दीप व आरती करावी.
ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम: या मंत्राने एक जप माळ करावी.
या दिवशी भजन, किर्तन आयोजीत करता येतात. 
या दिवशी दत्त गुरुंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करावा.
दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी.
या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे.
 
दत्तात्रेय मंत्र
बीज मंत्र - “ॐ द्रां।”
तांत्रोक्त दत्तात्रेय मंत्र- “ॐ द्रांदत्तात्रेयाय नम:”
दत्त गायत्री मंत्र- “ॐ दिगंबराय विद्महेयोगीश्रारय्धीमही तन्नो दत: प्रचोदयात”
दत्तात्रेय महामंत्र- “दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”
* दक्षिणामूर्ति बीजम च रामा बीकेन संयुक्तम्।
द्रम इत्यक्षक्षाराम गनम बिंदूनाथाकलातमकम दत्तास्यादि मंत्रस्य दत्रेया स्यादिमाश्रवह तत्रैस्तृप्य सम्यक्त्वंबिन्दुनाद कलात्मिका येतत बीजम्मयापा रोक्तम्ब्रह्म-विष्णु- शिव नामकाम।
 
श्री दत्तात्रेय मंत्राचे फायदे Shri Dattatreya Mantra Labh
या श्री दत्तात्रेय मंत्रांचा नियमित जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते.
 
श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होते.
 
चिंता किंवा अज्ञात भीतीपासून मुक्त होण्यासाठी दत्तात्रेय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतं.
 
अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप करावा.
 
सर्व प्रकारचे मानसिक त्रास किंवा अगदी कौटुंबिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्र खूप प्रभावी आहेत.
 
श्री दत्तात्रेय मंत्राचा दररोज जप केल्याने आध्यात्मिक प्रवृत्ती विकसित होते. आणि व्यक्तीच्या आत्म्याला सर्व प्रकारच्या कर्म बंधनांपासून मुक्ती मिळते.