शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:33 IST)

Datta Jayanti हे 2 शक्तिशाली मंत्र, सर्व दोष दूर करतील

पितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास अनुभवत असेल त्यांनी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. केवळ दत्ताचे दर्शन घेतल्यानेसुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं.
 
तसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतू विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.
 
दत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात.