सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

या प्रकारे करा दत्ताची उपासना

दत्ताची उपासना करताना गंध, फुले, उदबत्ती, अत्तर, या वस्तू असाव्यात. 
 
गंध : दत्ताला अनामिकेने गंध लावावे.
 
फुले : जाई आणि निशिगंध ही फुले सात किंवा सातच्या पटीत वाहावीत.
 
उदबत्ती : चंदन, केवडा, चमेली, जाई किंवा अंबर या गंधाच्या उदबत्त्या लावाव्यात.
 
अत्तर : दत्ताला ‘वाळा’ या गंधाचे अत्तर अर्पण करावे.
 
प्रदक्षिणा : दत्ताभोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात.