बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ

दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ
गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.
 
४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत. तसेच गाय आणि कुत्रे एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत.
 
औदुंबर वृक्ष : दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबर वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप आहे. या वृक्षात दत्ततत्त्व अधिक आहे.
 
दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ
 
कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. तसेच कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे.
 
शंख आणि चक्र : श्रीविष्णूचे प्रतीक आहे.
 
त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.
 
झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.