मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By

श्री सप्‍तशती गुरुचरित्र - अध्याय २५

होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन । सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥
म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र । वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥
राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत । विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥
ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती । त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥
जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें । कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥
यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ । यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥
वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें । मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥
गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया । वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥
विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती । तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥
गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले । व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो०