गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (12:33 IST)

गुरुचरित्र – अध्याय छत्तिसावा

Shri Guru Charitra Adhyay 36
॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी ।
विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे करूनिया ॥१॥
 
जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक भवार्णी ।
तूचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥२॥
 
मायामोहरजनीत । होतो आपण निद्रिस्त ।
कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केले आम्हांसी ॥३॥
 
तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी गुरु ।
कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥४॥
 
ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी भावभक्तीसी ।
गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे ॥५॥
 
पुढे चरित्र केवी झाले । विस्तारावे स्वामी वहिले ।
आमुते स्वामी कृतार्थ केले । ज्ञानामृत प्राशवून ॥६॥
 
कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न होय अंतःकरणी ।
निरोपावे विस्तारोनि म्हणोनि चरणी लागला ॥७॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा झाली निका ।
एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥८॥
 
गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा वाढली अपरंपारु ।
बोलता असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसो ॥९॥
 
महिमा एकेक सांगता । विस्तार होईल बहु कथा ।
अवतार श्रीहरी साक्षाता । कवण शके वर्णावया ॥१०॥
 
तया गाणगापुरात । होता विप्र वेदरत ।
विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे वर्ततसे ॥११॥
 
न घेतला प्रतिग्रह त्याणे । परान्नासी न वचे नेणे ।
मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न करीच ॥१२॥
 
नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे आपुले उदर भरी ।
तयाची नारी असे घरी । क्रोधवंत परियेसा ॥१३॥
 
याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी संसार सामान्यपणे ।
अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न प्रत्यही ॥१४॥
 
तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र येती समाराधनेसी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥१५॥
 
समस्त जावोनि भोजन करिती । तया विप्रवनितेप्रती ।
येऊनि गृही स्तुति करिती । अनेक परीची पक्वान्ने ॥१६॥
 
ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी दुःख करी ।
परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनात ॥१७॥
 
कैसे दैव आपुले हीन । नेणे स्वप्नी ऐसे अन्न ।
दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट भोगितसे ॥१८॥
 
पूर्वजन्मीचे आराधन । तैसा आपणासी पति हीन ।
सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो देवराया ॥१९॥
 
समस्त विप्र स्त्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत ।
पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते समस्ती ॥२०॥
 
आपुला पति दैवहीन । कदा नेणे परान्नभोजन ।
काय करावे नारायण । म्हणोनि चिंती मनात ॥२१॥
 
वर्तता ऐसे तया स्थानी । आला विप्र महाधनी ।
अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला परियेसी ॥२२॥
 
तया स्थानी विप्रासी । क्षण दिले परियेसी ।
सवे त्यांच्या स्त्रियांसी । आवंतिले तिही परियेसा ॥२३॥
 
देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता ।
सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचे ॥२४॥
 
अनेक परीची पक्वान्ने । देताती वस्त्रे परिधाने ।
अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती ऐके प्राणेश्वरा ॥२५॥
 
याते स्वामी अंगीकारणे । अथवा आपण निरोप देणे ।
कांक्षा करिते माझे मन । अपूर्व अन्न जेवावे ॥२६॥
 
ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण ।
सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥२७॥
 
निरोप घेउनी तये वेळी । गेली तया गृहस्थाजवळी ।
आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे तयासी ॥२८॥
 
विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगू दंपतीसी ।
बोलावी आपुल्या पतीसी । तरीच आमुच्या गृहा यावे ॥२९॥
 
ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी खेदे खिन्न ।
विचार करी आपुले मन । काय करावे म्हणोनिया ॥३०॥
 
म्हणे आता काय करणे । कैसे दैव आपुले उणे ।
बरवे अन्न स्वप्नी नेणे । पतीकरिता आपणासी ॥३१॥
 
विचारोनि मानसी । आली नृसिंहगुरूपासी ।
नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी विनवीतसे ॥३२॥
 
म्हणे स्वामी काय करणे । बरवे अन्न कधी नेणे ।
आपुले पतीसी सांगणे । आवंतणे बरवे येतसे ॥३३॥
 
सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी ।
न वचे कधी परान्नासी । काय करू म्हणतसे ॥३४॥
 
स्वामी आता कृपा करणे । माझ्या पतीते सांगणे ।
बरवी येताती आमंत्रणे । अन्नवस्त्र देताती ॥३५॥
 
ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥३६॥
 
श्रीगुरु म्हणती तयासी । जावे तुम्ही आवंतणेसी ।
तुझे स्त्रियेचे मानसी । असे मिष्टान्न जेवावे ॥३७॥
 
तिचे मनींची वासना जाण । तुवा पुरवावी कारण ।
सदा दुश्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचे असो नये ॥३८॥
 
ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी तो ब्राह्मण ।
विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा नेम असे ॥३९॥
 
गुरुवचन जो न करी । तोचि पडे रौरवघोरी ।
निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन त्वरित म्हणतसे ॥४०॥
 
पुसोनिया श्रीगुरूसी । आले दंपत्य आवंतणेसी ।
आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेते ॥४१॥
 
पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण ।
अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती तया दंपतीसी ॥४२॥
 
भोजन करिता समयासी । दिसे विपरीत तियेसी ।
श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे जेविताती ॥४३॥
 
कंटाळले तिचे मन । उठली आपण त्यजुनी अन्न ।
जे जेवीत होते ब्राह्मण । तया समस्तांसी सांगतसे ॥४४॥
 
ऐसेपरी पतीसहित । आली नारी चिंताक्रांत ।
पतीस सांगे वृत्तान्त । श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥४५॥
 
स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझे नि आपुले दैव हीन ।
घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट श्वानसूकरांचे ॥४६॥
 
ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली दोघे श्रीगुरुपासी ।
नमन केले परियेसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥४७॥
 
श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे सुख परान्नासी ।
सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥४८॥
 
ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणी ।
विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे स्वामिया ॥४९॥
 
मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी ।
नेले आपण परान्नासी । क्षमा करणे स्वामिया ॥५०॥
 
चिंता करी द्विजवरू । म्हणे स्वामी काय करू ।
दोष घडला अपारू । व्रतभंग झाला म्हणोनि ॥५१॥
 
परान्न न घ्यावे म्हणोनि । संकल्प होता माझे मनी ।
मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविला ॥५२॥
 
ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
पुरविली स्त्रियेची वासना । आता तिचे मन धाले ॥५३॥
 
कधी न वचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसी ।
न करी चिंता मानसी । दोष तुज नाही जाण ॥५४॥
 
आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म घडती सहज ।
अडला असेल एखादा द्विज । देवपितृकर्माविणे ॥५५॥
 
कोणी न मिळती विप्र त्यासी । जावे तेथे भोजनासी ।
जरी तेथे तू न जासी । अनंत दोष असे जाण ॥५६॥
 
श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥५७॥
 
अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील दोष कवणेपरी ।
जाऊ नये कवणा घरी । निरोपावे स्वामिया ॥५८॥
 
विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती विस्तारोन ।
सावधान करून मन । ऐका श्रोते सकळिक ॥५९॥
 
श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावया घरे पुससी ।
गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे शिष्यवर्गा घरी ॥६०॥
 
वैदिकादि विद्वज्जन । मातुळ आपुला श्वशुर जाण ।
सहोदरादि साधुजन । तया घरि जेवावे ॥६१॥
 
अडला विप्र ब्राह्मणाविण । त्याचे घरी घ्यावे अन्न ।
करावे गायत्रीजपन । दोष जाती अवधारा ॥६२॥
 
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत माझी परियेसी ।
निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या घरी जेवू नये ॥६३॥
 
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरे ऐसी ।
अपार असे स्मृति चंद्रिकेसी । ऋषिसंमते सांगेन ॥६४॥
 
नित्य मातापितयांसी । सेवा घेती अतिदोषी ।
जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ द्विजांघरी ॥६५॥
 
कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी विप्रालागोनि ।
अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती जेविल्या ॥६६॥
 
गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी । विप्र जाण मल्लयुद्ध करी ।
वीणा वाद्य ज्याचे घरी । न घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥६७॥
 
बहिष्कारी विप्राघरी । याचकवृत्तीने उदर भरी ।
अन्न वर्जावे तया घरी । आत्मस्तुति परनिंदक ॥६८॥
 
बहुजन एक अन्न करिती । पृथक्‌ वैश्वदेव न करिती ।
वर्जावी अन्ने विप्रजाती । महादोष बोलिजे ॥६९॥
 
गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण मंत्र उपदेशी ।
शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी । त्या गुरुघरी जेवू नये ॥७०॥
 
क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे ।
स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवू नये तया घरी ॥७१॥
 
धनगर्वी तामसाघरी । कृपण निर्द्रव्य व्यभिचारी ।
दांभिक दुराचारी विप्राघरी । अन्न तुम्ही वर्जावे ॥७२॥
 
पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी ।
वर्जावे अन्न साधुजनी । महादोष बोलिजे ॥७३॥
 
स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी ।
सदा बहु याचक जरी । तया घरी न जेवावे ॥७४॥
 
खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन करी ।
वस्त्रधुत्या रजकाघरी । दान विप्रे घेऊ नये ॥७५॥
 
मद्यपान नराघरी । याचने उदरपूर्ति करी ।
वेश्मी सहजार असे नारी । दान विप्रे न घ्यावे ॥७६॥
 
तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळकाघरी परियेसी ।
न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष बोलिजे ॥७७॥
 
द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन सांगे द्विजवरी ।
अन्न वर्जावे तया घरी । घोडी विकी जो ब्राह्मण ॥७८॥
 
भागवतकीर्तन नाही घरी । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी ।
स्नानावीण भोजन करी । तया घरी जेवू नये ॥७९॥
 
न करी संध्या सायंकाळी । दान न करी कदा काळी ।
पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी न जेवावे ॥८०॥
 
दंभार्थाने जो जप करी । अथवा कापट्यरूपे जरी ।
द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी जेवू नये ॥८१॥
 
ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसी ।
द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी जेवू नये ॥८२॥
 
विश्वासघातकी नराघरी । अनीति पक्षपात करी ।
स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥८३॥
 
विद्वज्जन ब्राह्मण साधूसी । एखादा करी अति द्वेषी ।
अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया घरी जेवू नये ॥८४॥
 
कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता ।
आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू नये तया घरी ॥८५॥
 
गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर असे जरी ।
अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती विप्रासी ॥८६॥
 
आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे एका द्वारु ।
दान देता वर्जी जरु । जेवू नये तया घरी ॥८७॥
 
समस्त जातीस करी शरण । तोचि चांडाळ होय जाण ।
घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी विप्रासी ॥८८॥
 
आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे करून सदा दूषी ।
न घ्यावे अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरी देखा ॥८९॥
 
पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरी अन्न ।
परपाक करी तया नाम जाण । तया घरी जेवू नये ॥९०॥
 
विवाह झाला असता आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण ।
स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न जेवावे तया घरी ॥९१॥
 
घरचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति करी ।
अन्न वर्जावे तया घरी । श्वपच नाम तयाचे ॥९२॥
 
भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया घरी ।
डोळे जाती अवधारी । आंधळा होय अल्पायुषी ॥९३॥
 
बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा जाय जाण ।
धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी जेवू नये ॥९४॥
 
गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न करी जाण ।
अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया घरी जेवू नये ॥९५॥
 
परगृही वास आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण ।
त्याचे जितुके असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥९६॥
 
तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्श ।
त्याचिकारणे निषिद्ध असे । परान्न तुम्ही वर्जावे ॥९७॥
 
भूदान गोदान सुवर्णदान । गजवाजीरत्‍नदान ।
घेता नाही महादूषण । अन्नदाना अतिदोष असे ॥९८॥
 
समस्त दुष्कृत परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी ।
तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥९९॥
 
परगृही वास करिता । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता ।
अमावास्येसी परान्न जेविता । मासपुण्य जाय देखा ॥१००॥
 
अगत्य जाणे परान्नासी । न बोलाविता जाय संतोषी ।
जाता होती महादोषी । शूद्रे बोलाविता जाऊ नये ॥१॥
 
आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ नये भोजनासी ।
पुत्र झालिया कन्येसी । सुखे जावे अवधारा ॥२॥
 
सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ नये परियेसी ।
जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये परियेसा ॥३॥
 
ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर ।
तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे दैन्य असे ॥४॥
 
समस्त देव त्याचे होती । अष्ट महासिद्धि साधती ।
ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु तया घरी ॥५॥
 
विप्र मदांधे व्यापिले । आचारकर्मे सांडिले ।
याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्म नष्ट होऊनिया ॥६॥
 
विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसी ।
सकळ आचारधर्मासी । निरोपावे दातारा ॥७॥
 
श्रीगुरुमूर्ति कृपासागरु । त्रिमूर्तीच्या अवतारु ।
भक्तजनांच्या आधारु । निरोपावे आचार ब्राह्मणाचे ॥८॥
 
श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी ऋषि आचरले जे ॥९॥
 
नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप करिती बहु दिवसी ।
आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥११०॥
 
समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर जोडून ।
ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे म्हणती ते ॥११॥
 
आता आम्ही आचार करितो । तेणे संशय मनी येतो ।
ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो । तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥१२॥
 
गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य नव्हे हो पवित्र ।
तैसा श्रीगुरु तू सत्पात्र । आचार आम्हा सांगावे ॥१३॥
 
पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार तुम्हासी ।
जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि पावती ॥१४॥
 
ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि ।
मग ध्याव्या मूर्ति तिन्ही । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥१५॥
 
मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन-सह । स्मरावे तये वेळी ॥१६॥
 
सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी देखा ।
सप्त समुद्र असती जे का । स्मरावे सप्त पितृदेवता ॥१७॥
 
सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त द्वीपे सप्त भुवनी ।
समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे प्रातःस्मरण ॥१८॥
 
मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि दोनी ।
लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे ॥१९॥
 
पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमनविधीसी ।
सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी करणे ऐका ॥१२०॥
 
स्नानापूर्वी अपर दोनी । उदक प्राशिता येणेचि गुणी ।
निजता उठता समयी दोनी । आचमने करावी ॥२१॥
 
अधोवायुशब्द झालिया । वोखटे दृष्टी देखिलिया ।
दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि व्हावे परियेसा ॥२२॥
 
भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया शिंकलिया दोनी ।
लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे ॥२३॥
 
जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी ।
स्पर्श करावा अक्ष श्रोत्री । येणे पवित्र परियेसा ॥२४॥
 
ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त देवता असती निर्गुणी ।
त्यासी स्पर्शिता तत्क्षणी । आचमनफळ असे देखा ॥२५॥
 
श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च वरुणार्कैद्रवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः ॥२६॥
 
टीका । त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ॥२७॥
 
लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम स्नान करा सुमनी ।
बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय तव ॥२८॥
 
गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त । वरकड जपावे पवित्र ।
प्रगट होता अरुणोदित । बहिर्भूमीसी जाईजे ॥२९॥
 
यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल पालव घालूनि ।
नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी बैसावे ॥१३०॥
 
दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री बैसावे दक्षिणमुखी ।
मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू नये ॥३१॥
 
सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू नये नदी-आकाशी ।
स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये कवणाते ॥३२॥
 
शौचाविणे कांस घाली । कांस न काढी लघुशंकाकाळी ।
त्यासी होय यमपुरी अढळी । नरक भोगी अवधारा ॥३३॥
 
अगत्य घडे उदकावीण । करूनिया गंगास्मरण ।
मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि वर्जावे ॥३४॥
 
बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा परियेसी ।
ऐका समस्त तत्परेसी । म्हणे पराशर सर्वाते ॥३५॥
 
न बैसावे भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी ।
हिरवी पर्णे करावी दुरी । वाळल्या पानी बैसावे ॥३६॥
 
जे ब्राह्मण उभ्या मुतती । त्यांसी ऐका कवण गति ।
त्यांचे रोमे अंगी किती । तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥३७॥
 
मळविसर्जन करूनि । उठावे हाती शिश्न धरूनि ।
जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे परियेसा ॥३८॥
 
मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी ।
वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील आणु नये ॥३९॥
 
ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती ।
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥१४०॥
 
वापी कूप तडागात । मृत्तिका आणिता पुण्य बहुत ।
उदक करी घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्यावी शौचासी ॥४१॥
 
आवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानी एक लावावे ।
अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका हस्तासी तीन सप्ते ॥४२॥
 
एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका लावावी सकळ ।
आणिक सांगेन समय केवळ । ऋषि समस्त परियेसा ॥४३॥
 
या मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण ।
बहुर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥४४॥
 
आणिक प्रकार असे देखा । करावे येणेप्रमाणे ऐका ।
जितुके करणे गृहस्थ लोका । द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥४५॥
 
त्रिगुण करावे वानप्रस्थे । चतुर्गुण करावे यती समस्ते ।
न्यून पूर्ण करावे यापरते । धर्मसिद्धि होय देखा ॥४६॥
 
येणे प्रकारे करा दिवसी । रात्री याच्या अर्धैसी ।
संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे अर्ध त्याहुनी ॥४७॥
 
व्रतबंध झालिया ब्राह्मणासी । हाच आचार परियेसी ।
हाचि उपदेश चहू वर्णासी । शौचविधि बोलिला ॥४८॥
 
शौच केलियानंतरी । चूळ भरावे परिकरी ।
ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये सहा परियेसा ॥४९॥
 
वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ । येणे विधि भरा चूळ ।
अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर ऋषि ॥१५०॥
 
चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन वेळा ।
शुचिस्थानी बैसून निर्मळा । कुळदेवता स्मरावी ॥५१॥
 
तूष्णीम्‍ आचमन करावे । नाम घेता चोवीस ठावे ।
आतळावे पुनः आचमावे । त्याचा विधी सांगेन ॥५२॥
 
विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे विख्यात असती ।
जे बोलिले असे श्रुती । सांगेन तीर्थ अवधारा ॥५३॥
 
अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी ।
तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ॥५४॥
 
चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी ।
कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ॥५५॥
 
तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी तीर्थै करावी हर्षी ।
आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा ब्राह्मण विद्वज्जन ॥५६॥
 
ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही । केशव नारायण माधव म्हणोनि ।
देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद नाम उच्चारावे ॥५७॥
 
विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि ।
बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि । श्रीधर नाम उच्चारावे ॥५८॥
 
पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ पादद्वय स्पर्शी ।
सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर शिखास्थानी ॥५९॥
 
चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण घ्राणेसी ।
तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा वासुदेव प्रद्युम्न ॥१६०॥
 
अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श श्रोत्रेसी ।
कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत नाभी म्हणावे ॥६१॥
 
पंचांगुली उपेंद्र देखा । हरी श्रीकृष्ण भुजा एका ।
पाच अंगुली विधिपूर्वका । येणे विधी स्पर्शावे ॥६२॥
 
विधी संध्याकाळी । आणिक करावे वेळोवेळी ।
अशौच अथवा संकटकाळी । असती विधाने ती ऐका ॥६३॥
 
देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त प्रक्षाळा गोविंद नावे ।
मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥६४॥
 
विधान आणिक सांगेन । देवतीर्थे तिनी घेऊन ।
गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु श्रोत्र स्पर्शावे ॥६५॥
 
शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श होता परियेसी ।
आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती ब्राह्मणाते ॥६६॥
 
भिजोनि आलिया पाउसात । द्विराचमने होय पुनीत ।
स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन करावे ॥६७॥
 
फलाहार भक्षण करिता । अथवा आपण उदक घेता ।
आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमने शुद्ध होय ॥६८॥
 
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी ।
आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन करावे ॥६९॥
 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे तया घरी ॥१७०॥
 
आता सांगेन विधान । करावया दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥७१॥
 
न करावे नवमीद्वादशीसी । शनयर्कमंगळवारेसी ।
श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू नये दंतधावन ॥७२॥
 
कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी ।
खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया जन्म चांडाळयोनी ॥७३॥
 
खदिरकरंजाआघाडेसी । औदुंबरार्कवटशाखेसी ।
अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य वृक्ष ऐका तुम्ही ॥७४॥
 
विप्रे द्वादशांगुलेसी । नवांगुले क्षत्रियासी ।
षडांगुले वैश्यशूद्रांसी । दंतधावन काष्ठ आणावे ॥७५॥
 
दंतधावन काष्ठेसी । तोडिता म्हणावे मंत्रासी ।
आयुः प्रज्ञा नाम परियेसी । म्हणोनि काष्ठ तोडावे ॥७६॥
 
दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे ॥७७॥
 
मग करावे प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन ।
तेजोबलाआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥७८॥
 
प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवते होती वश ।
सौभाग्य सुख होती हर्ष । प्रातःस्नान केलिया ॥७९॥
 
यती तापसी संन्यासी । त्रिकाळ करावे स्नानासी ।
ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ करावे ॥१८०॥
 
नित्य केलिया पापनाश असे । करावे याचि कारणे हर्षे ।
गृहस्थे वानप्रस्थे विशेषे । प्रातर्मध्याह्नी करावे ॥८१॥
 
अशक्य संकट आले जरी । अथवा न मिळे निर्मल वारि ।
स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥८२॥
 
अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे वायुस्नान ।
करा विधीने मंत्रस्नान । आपोहिष्ठा मंत्राने ॥८३॥
 
आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल भावभक्ति ।
गुरुदेवता दर्शनमात्री । तीर्थस्नानफळ असे ॥८४॥
 
अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ भक्तीने घेता ।
अंगावरी प्रोक्षिता । तीर्थस्नानफळ असे ॥८५॥
 
अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ असे देखा ॥८६॥
 
स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने होय शुचिता ।
शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान करावे ॥८७॥
 
दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य करावे जले ।
संधि-विग्रह-साकडे पडले । उषःस्नान करावे ॥८८॥
 
प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसी ।
अशक्तता असेल देहासी । उष्णोदके करावे ॥८९॥
 
स्वभावे पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झाले उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥१९०॥
 
उष्णोदके स्नान करिता । शीतोदक करा मिश्रित ।
मध्ये करावे आचमन तत्त्वता । संकल्प तेथे म्हणावा ॥९१॥
 
घरी स्नान करिता देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका ।
वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले हस्ते करूनिया ॥९२॥
 
पुत्रोत्साह संक्रांतीसी । श्राद्धकाळ मृतदिवसी ।
न करावे स्नान उष्णोदकेसी । अमावास्या पौर्णिमा ॥९३॥
 
स्नान करिता बांधा शिखा । दर्भहस्ती सूर्याभिमुखा ।
मौन असावे विवेका । कवणासवे न बोलावे ॥९४॥
 
आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री तीन म्हणा सुरसी ।
येणेपरी स्नानोदकासी । अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥९५॥
 
प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक मिळवोनि ।
स्नान करावे प्रतिदिनी । गृहस्थांनी घरी देखा ॥९६॥
 
अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र उकलावे त्वरित ।
उद्यंत मंत्र जपत । वस्त्र सूर्यासी दाखवावे ॥९७॥
 
आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र जपोन ।
धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र जपावे ॥९८॥
 
आवहंती वितन्वती मंत्रे । वस्त्रे नेसावी पवित्र ।
द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥९९॥
 
आता मंत्रस्नान करणे । सांगेन त्याची विधाने ।
आपोहिष्ठादि मंत्राने । प्रोक्षावे शरीरावरी ॥२००॥
 
पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी । मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि ।
करावे तुम्ही मार्जनी । आपोहिष्ठा मंत्रेसी ॥१॥
 
ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन करोनि ।
मानसस्नान विधींनी । करावे ऐका भक्तीने ॥२॥
 
नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान करावे भक्तीसी ।
चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान केलिया मानसन्मान ॥३॥
 
अपवित्रः पवित्रो वा । येणे मंत्रे हरि ध्यावा ।
उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ अवधारा ॥४॥
 
मंगलस्नानविधा । सांगेन ऐका ब्राह्मण ।
रविवारी निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥५॥
 
नदीतीरी असे नरु । अशक्त असे शरीरु ।
गंगास्मरणे निर्धारु । आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥६॥
 
कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी मृत्यु परियेसी ।
लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि गुरुवारी ॥७॥
 
शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी अखिल संपत ।
जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान करावे ॥८॥
 
नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःसूर्याभिमुखी ।
संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान करावे अवधारा ॥९॥
 
स्नान करिता नदीसी । अघमर्षण करावे परियेसी ।
नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी । नदीस्नान करावे ॥२१०॥
 

यदपांक्रूर मत्रेंसी । उदक लोटावे द्विहस्तेसी । तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे गंगे जपावे ॥११॥
ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान करावे गंगेत । नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥१२॥
रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती । स्नानावेगळे शुद्ध न होती । स्नान करावे अवधारा ॥१३॥
आता वस्त्रावे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये गृहस्थाने ॥१४॥
रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र । नेसूनि जे जन जप करीत । ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥१५॥
श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसी । उपवस्त्र वहिर्वासी । उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥१६॥
धोत्र नेसलिया नंतरी । विभूति लावावी परिकरी । मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावे ॥१७॥
भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावावे परी । द्वारावती मुख्य धरी । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥१८॥
न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका । ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तया ॥१९॥
पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे तेणे अंगुष्ठेसी । ज्यासी काम असे आयुधी । मध्यांगुली लावावे ॥२२०॥
अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य मुक्तीसी । जे लाविती नखेसी । महापातक घडे तया ॥२१॥
उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव आष्ट अंगुली । सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार लावावे ॥२२॥
चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम पक्ष असे बोली । द्वादश नामे करा भली । विष्णुनाम उच्चारित ॥२३॥
केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी नारायण म्हणोनि । माधवनामे ह्रदयस्थानी । कमळपुष्पाकार देखा ॥२४॥
गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे कटिप्रदेशी । दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी उत्तर त्रिविक्रम ॥२५॥
वामन नामे बाहु देखा । श्रीधर दक्षिणकर्णिका । ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ दक्षिणकटी ॥२६॥
दामोदर शिरस्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्रविधान । पापे जाती जळोन । गोपीचंदन लाविता ॥२७॥
द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनी । हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति मुक्ति देखा ॥२८॥
विवाहादि शोभन दिवसी । देवताकृत्य श्राद्धदिवसी । अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावे ॥२९॥
ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेसी । आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन विख्यात ॥२३०॥
दूर्वा उशीर कुश काश । सकुद गोधूम व्रीहि मौजीष । नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥३१॥
नित्य आणावे दूर्वैसी । जरी न साधे आपणासी । श्रावण भाद्रपदमासी । संग्रह संवत्सरी करावा ॥३२॥
चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि क्षत्रिय-वैश्यासी । एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी धरावे ॥३३॥
या दूर्वेची महिमा । सांगता असे अनुपमा । अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी रुद्र मध्ये हरि ॥३४॥
अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी द्वयांगुल । धारण करावे ब्रह्मकुळे । याची महिमा थोर असे ॥३५॥
चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका । ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक केवी होय ॥३६॥
इंद्र वज्रायुध धरिता । दैत्यगिरी विभांडी तत्त्वता । तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता । पापदुरिते पराभवती ॥३७॥
जैसे तृणाचे बणवीसी । अग्निस्पर्श होता नाशी । तेवी आलिया पापराशि । दर्भस्पर्शै जळती देखा ॥३८॥
ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि बांधावी कुशाग्री । वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी ब्राह्मणे भक्तीने ॥३९॥
कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि बांधावी परियेसी । अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप नाशी येणेपरी ॥२४०॥
एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावे पवित्र । नित्य-कर्मासी हेच पवित्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥४१॥
जपहोमादि दानासी । स्वाध्याय पितृकर्मासी । सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे न करावे ॥४२॥
देवपितृकर्मासी देख । रजत करावे सुवर्णयुक्त । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥४३॥
मुद्रिका असावी खड्‍गपात्री । कनिष्ठिकांगुली पवित्री । ग्राह्य नव्हे जीवंतपित्री । तर्जनांगुली मुद्रिका ॥४४॥
योगपट उत्तरी देखा । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । पायी न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावे ॥४५॥
नवर‍त्‍न मुद्रिका ज्याचे हाती । पापे त्यासी न लागती । एखादे रत्‍न असता हाती । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥४६॥
प्रातःसंध्येच विधान । सांगेन ऐका ऋषिजन । नक्षत्र असतांचि प्रारंभून । अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥४७॥
सूर्योदय होय तव । जप करीत उभे असावे । उदयसमयी अर्घ्य द्यावे । तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥४८॥
ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी । विस्तारोनि आम्हांसी । सांगावे जी स्वामिया ॥४९॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन संध्याविधिसी । ऐका तुम्ही तत्परेसी । पराशरस्मृतीसी असे ॥२५०॥
गायत्रीमंत्र जप करिता । शिखा बांधावी तत्त्वता । आसन घालावे निरुता । दर्भपाणि होउनी ॥५१॥
देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम स्मरोन । प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥५२॥
प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री नाम छंदासी । परमात्मा देवता परियेसी । म्हणा प्राणायामे विनियोगः ॥५३॥
ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया । व्याह्रति सप्त अतिशया । प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥५४॥
व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका असे प्रजापति ऋषि । प्रत्येक देवता परियेसी । सप्त नामे देवांची ॥५५॥
अग्निर्वायु गुरुः सूर्य । वरुणेंद्र विश्वदेव । सप्त व्याह्रति सप्त देव । छंद सप्त सांगेन ॥५६॥
गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप्‍ बृहती पंक्ति पंचम ऐका । त्रिष्टुप्‍ जगती छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥५७॥
ॐ भूः पादन्यास । ॐ भुवः जानु स्वः गुह्य । ॐ महः नाभि स्थान स्पर्शा । जनो ह्रदय तपो कंठ ॥॥५८॥॥
ॐ भू र्ह्रदयाय नम इति । ॐ भुवः शिरसे स्वाहेति । ॐ स्वः शिखायै वषडिति । ॐ तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ॥२६०॥
ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट्‍ । धियोयोनः प्रचोदयात्‍ अस्त्राय फट्‍ । ॐ भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग करावे ॥६१॥
प्राणायामे विनियोगः म्हणुनि । आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो जिव्हामृतललाटे ॥६२॥
प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणती ऋषि । देवतानामे परियेसी । ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥६३॥
ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जप कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥६४॥
गायत्रीची अधिदेवता । ब्रह्माग्निवायु सविता । ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त लोकन्यास सांगेन ॥६५॥
पादन्यास भुर्लोक । भुवः जानु अतिविशेख । स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास महर्लोक ॥६६॥
जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे सत्यलोक म्हणावे । ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक म्हणती तयासी ॥६७॥
गायत्रीची प्रार्थना करूनि । प्राणायाम करा विधींनी । ब्रह्मचारी गृहस्थानी । पंचांगुली धरा परमेष्ठी ॥६८॥
वानप्रस्थ संन्यासी यती । अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी । ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे चढवावे ॥६९॥
वामनासापुटी विसर्जोनि । करा प्राणायाम तिन्ही । येणेचि विधी करा मुनि । त्रिकालसंध्या कर्मै ॥२७०॥
आता करावे मार्जनेसी । सांगेन ऐका समस्त ऋषि । जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी । तेणे विधी सांगतो ॥७१॥
आपोहिष्ठेति सूक्तेसी । सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी । आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥७२॥
येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे करा मार्जन । यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले पाद प्रोक्षावे ॥७३॥
आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे आपुल्या शिरसी । सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक प्राशन करावे ॥७४॥
हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन करावे परियेसी । द्रुपदादिवेति मंत्रेसी । घ्राणोनि उदक सोडावे ॥७५॥
आचमने करोनि दोन । मार्जनविधान सांगेन । वामहस्ती पात्र धरून । मार्जन करा विशेषी ॥७६॥
औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही असे पवित्र । ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती उदक बरवे ॥७७॥
मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न पात्र ते जाण अपवित्र । ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥७८॥
मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी अष्ट पादे नवका । यस्य क्षयाय स्नान भुमिका । येणेपरी मार्जन ॥७९॥
आपः पुनन्तु मंत्रेसी । प्राशनोदक माध्याह्नेसी । अग्निश्चेति मंत्रेसी । सायंसंध्या करावी ॥२८०॥
प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका । आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक आचमन करावे ॥८१॥
अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य द्यावे मनोभावे ॥८२॥
गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावी तिन्ही । हंसःशुचिषेति माध्याह्नी । अर्घ्य द्यावे अवधारा ॥८३॥
प्रातर्माध्याह्नी उभे बरवे । सायं अर्घ्य बैसोनि द्यावे । आचमन त्रिवारी करावे । करी प्रदक्षिणा असावादित्य ॥८४॥
अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन कथा विस्तारोन । राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेती देखा ॥८५॥
सूर्यासवे युद्धासी। नित्य येतीपरियेसी । संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥८६॥
अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान न होय परियेसी । कर्मै न चालती ब्राह्मणांसी । स्वाहास्वधाकार न चाले ॥८७॥
स्वाहास्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास होती । सृष्टि राहिली न होय उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥८८॥
याचि कारणे अर्घ्य देती । तीचि वज्रायुधे होती । जावोनि दैत्यांसी लागती । पराभविती प्रतिदिवसी ॥८९॥
दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष । प्रदक्षिणा करिता होय नाश । असावादित्य म्हणोनिया ॥२९०॥
ब्रह्महत्येचिया पातकासी । भूमिप्रदक्षिणा दोष नाशी । चार पावले फिरता कैसी । भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥९१॥
संध्या करावयाचे स्थान । सांगेन ऐका फलविधान । घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥९२॥
दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शताधिका । पुष्करतीरी सहस्त्र ऐका । गंगासुरनदी कोटिफल ॥९३॥
सुरापान दिवा मैथुन । अनृतादि वाक्ये पापे जाण । संध्या बाहेर करिता क्षण । जळती दोष तात्काळी ॥९४॥
स्थाने असती जप करावयासी । विस्तारे सांगेन तुम्हासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्ते परियेसा ॥९५॥
जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे देखा । बाहेर द्विगुणी फल अधिका । नदीतीरी त्रिगुण फल ॥९६॥
गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल अधिका । अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल अधिक असे ॥९७॥
तीर्थदेवता सन्निधानी । सहस्त्रफल असे निर्गुणी । शतकोटि फल हरिसन्निधानी । ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥९८॥
जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे परियेसी । सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप बोलिले असे ॥९९॥
काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता मनोहरी । दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष तो होय ॥३००॥
पल्लवशाखांसी बसता । सदा होय दुश्चिता । वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी व्याधि होय ॥१॥
भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी सुखसंतोष । कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥२॥
कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे उपहरण । पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा अधिक होय ॥३॥
ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा तुम्ही पवित्री । ध्यान करावे गायत्री । समस्त पापे हरती देखा ॥४॥
गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन असे वर्णिता । रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन असे देखा ॥५॥
अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा । कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करी ॥६॥
ऋग्वेद असे समागमी । अग्निहोत्रफल आवाहयामि । मग आयातु वरदा देवी । म्हणावे ऐका ब्राह्मणाने ॥७॥
त्या मंत्रासी ऋषि देवता । गायत्रीसदृश असे ख्याता । प्रातःसंध्या तुम्ही करिता । विधि तुम्हा सांगेन ॥८॥
गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदः । ॐ आदित्य देवता देवा । हे प्रातःसंध्या म्हणता भेद । गायत्री देवता गायत्री छंदः ॥९॥
गायत्री आवाहने विनियोगः । ही माध्याह्नसंध्या म्हणावी । सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती आवाहने विनियोगः ॥३१०॥
प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन । रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ असे ॥११॥
चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु धरिला विशेखी । अक्षसूत्र चाटु हस्तकी । ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥१२॥
ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे अक्षरज्ञानी । एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
ओंकार शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामी । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥१४॥
ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या करावी सुवेळी । आता सांगेन माध्याह्नकाळी । ध्यान आवाहनपूर्वक ॥१५॥
अभिभुरो सावित्रीध्यान । यौवनस्था माध्याह्न । सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते परियेसा ॥१६॥
श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन असे वृषभ पवित्र । उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥१७॥
वरद अभयहस्त देखा । रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका । यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥१८॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि ॥१९॥
आता सायंसंध्या ध्यान । सांगेन ऐका विधान । एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥३२०॥
अभिभूरो सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सायंसंध्या । कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना । गरुडवाहन असे देखा ॥२१॥
मकार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता । गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥२२॥
वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे ध्यान । करावे ऐका तुम्ही ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥२३॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥२४॥
पंचशीर्षोपनयने विनियोगः । प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । गायत्री छंदः ॥२५॥
उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप्‍ जगती छंदः । ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः । ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥२६॥
आहवनीयाग्निगार्हपत्य । दक्षिणाग्निउपस्थानानि । पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥२७॥
पीतविद्युतश्वेतवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि । विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी । जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥२८॥
ऐसे त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी । आता विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्ते ॥२९॥
ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः । ॐ अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे ॥३३०॥
भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी । अग्निर्देवता परिएय्सी । विश्वामित्र ऋषि देखा ॥३१॥
षड्‍ज स्वर श्वेत वर्ण । पादस्पर्श उच्चारोन । प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याह्रति म्हणावी ॥३२॥
भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक्‍ नाम छंदासी । वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि असे जाण ॥३३॥
असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श रूप उच्चारोन । करा तुम्ही ऐसे ध्यान । जानूमध्ये न्यासावे ॥३४॥
प्राणायाम विनियोग म्हणोनि । न्यास करावे भक्तिभावनी । स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान करा भक्तीने ॥३५॥
स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी । सविता देवता परियेसी । भारद्वाज ऋषि जाण ॥३६॥
स्वर गांधार पीतवर्णा । कंठी स्पर्शोन मंत्र म्हणा । प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याह्रतिमंत्रासी ॥३७॥
ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी । बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ ऋषि निर्धारे ॥३८॥
मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा तुम्ही ध्यान । वेगे म्हणा नाभी स्पर्शोन । प्राणायामे विनियोगः ॥३९॥
जन मंत्र उच्चारासी । म्हणा पंक्ति छंदासी । वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर असे जाण ॥३४०॥
रूप असे नीलवर्ण । करा न्यास ह्रदयस्थान । प्राणायामे विनियोगून । जनः पंच न्यास ऐसे ॥४१॥
तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप्‍ छंद परियेसी । ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत स्वर परियेसा ॥४२॥
असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे कंठस्थान । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मणहो ॥४३॥
सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे जगती छंदासी । विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद स्वर जाणावा ॥४४॥
रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा स्पर्शून । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तीने ॥४५॥
इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा शिरस्थानी । ध्यान करा विधानी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥४६॥
शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप्‍ छंदासी । उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाण ॥४७॥
प्राणायामे विनियोगून । मग करावे गायत्रीध्यान । ॐ आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा भक्तीने ॥४८॥
ॐ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःस्वरो । शिरसी येणे विधी । अंगन्यास करावे ॥४९॥
चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास सांगेन एकाएकासी । एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर ऋषि तो ॥३५०॥
या त्रिपदा गायत्रीसी । असे विश्वामित्र ऋषि । देवी गायत्री छंदेसी । वर्ण देवता सांगेन ॥५१॥
ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चोवीस अक्षरे परियेसी । पृथक्‍ न्यास परियेसी । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥५२॥
तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अग्नि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा ॥५३॥
अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप वर्ण असे परियेसी । वायव्य कोण स्थान त्यासी । गुल्फन्यास करावा ॥५४॥
त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वायुदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५५॥
जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप पिवळे सुरस । सर्व पापे दहती परियेस । त्सवर्णाचे लक्षण ॥५६॥
विवर्णनाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५७॥
न्यास करावया जानुस्थान । इंद्रनील विद्युद्वर्ण । ऐसे अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥५८॥
तुवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । विद्युद्देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥५९॥
न्यास करा जानुस्थानी । दीप्ति असे जैसा वह्नि । रूप असे सौम्यपणी । भ्रूणहत्यापाप नाशी ॥३६०॥
र्ववर्ण अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । सोम देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६१॥
सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी न्यास बोलती । समस्त अघौघ नाशती । रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥६२॥
रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वरुण देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६३॥
णिकार वृषणस्थान जाणा । विद्युत्प्रकाशरूपधारणा । बार्हस्पत्यनाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥६४॥
णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । बृहस्पति देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥६५॥
यं कटिस्थान शांताकारवर्ण । देहहत्यापापज्वलन । न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥६६॥
यं अक्षर म्हणावयासी । असे विश्वामित्र ऋषि । तारका दैवत परियेसी । देवी गायत्री छंद असे ॥६७॥
भकारा नाभी करा न्यास । कृष्णमेघवर्ण सुरस । पर्जन्य देवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥६८॥
भवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । पर्जन्य देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥६९॥
र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस । इंद्र देवता परियेस । गोहत्येचे पाप जाय ॥३७०॥
गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । इंद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७१॥
देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम देव परियेसी । स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते परियेसा ॥७२
देवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । गंधर्व देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥७३॥
वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल रूप वर्ण परियेस । पूषा देवता असे त्यास । वाणीजातपाप नाशी ॥७४॥
ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७५॥
स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण रूप सुरस । मित्र देवता परियेस । मार्जारकुक्कुटपाप जाय ॥७६॥
स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । मित्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥७७॥
धीकाराक्षरमंत्र दंती न्यास । शुक्लकुमुदसंकाश । त्वष्टा देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥७८॥
धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥७९॥
मकारन्यास तालुस्थान । पद्म तेजोमय जाण । वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥३८०॥
मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वासुदेव देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८१॥
हिकार नासिकी करा न्यास । शंखवर्ण असे त्यास । वासुदेव देवता परियेस । सर्व पाप हरण होय ॥८२॥
हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । मेरु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८३॥
धिकारा नेत्रस्थानी न्यास । पांडुरभास संकाश । सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥८४॥
धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८॥
योकाराक्षर मंत्रासी । भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी । रक्तगौरवर्ण रूपेसी । प्राणिवधपाप जाय ॥८६
योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । यमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥८७॥
योकार ललाटस्थानी न्यास । रूप रुक्मांभसंकाश । सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावे ॥८८
योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । विश्वे देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥८॥
नकारा उदित प्राङ्‌मुखा । सूर्यासमान तेज देखा । आश्विनौ देवता असे निका । विराजमान परियेस ॥३९०॥
नकाराक्षर वर्णासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अश्विनौ देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९१॥
प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे । रूप असे नीलवर्ण । प्रजापति देवता जाण । विष्णुसायुज्य पाविजे ९२॥
प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । प्रजापति देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९३॥
चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया पश्चिम भागासी । कुंकुमरूपवर्ण त्यासी । सर्वदेवपदवी पाविजे ॥९४॥
चोकार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । सर्व देवता परियेसी । गायत्री देवी छंद जाणा ॥९५॥
दकाराक्षराचा उत्तरे न्यास । शुक्लवर्ण रूप सुरस । करावे तुम्ही ऐसे न्यास । कैलासपद पाविजे ॥९६॥
दकाराक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९७॥
याकार मूर्धास्थानी न्यास । सुवर्णरूप सुरस । ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥९८॥
यावर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । ब्रह्म देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥९९॥
तकार न्यास शिखास्थानी । निरुपम वैष्णवभुवनी । विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥४०॥
तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥१॥
ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास करावे विधींसी । हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक न्यास करावे ॥२॥
शिरस्थानी न्यासासी । म्हणावे अनुष्टुप्‍ छंदासी । ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥३॥
प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि । रसोजिह्वा न्यासावे ॥४॥
अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि स्पर्शोनि ऐसी । ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास करा येणे विधी ॥५॥
इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि । व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळा ॥६॥
भुः० स्वः० विन्यसोनि । गायत्रीच्या दश पदांनी । दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण करावे ॥७॥
अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका स्पर्शोनि । उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली न्यासावे ॥८॥
चोवीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी । तर्जनीमूलादारभ्येसी । कनिष्ठिकापर्यंत ॥९॥
द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे न्यास सुनिश्चित । षडंगन्यास समस्त । प्रणवासहित करावे ॥४१०॥
ॐ भूः हिरण्यात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥११॥
ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ॐ महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः ।
ॐ जनः, ॐ तपः ॐ सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः । प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥१२॥
ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां ह्रदयाय नमः । वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे स्वाहा ।
भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै वषट्‍ । धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं ॥१३॥
धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात्‍ करतलकरपृष्ठाभ्यां अस्त्राय फट्‍ । उभयहस्तांगुलिन्यासं कुर्यात्‍ । अथ षडंगन्यासः ॥१४॥
ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा । ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट्‍ । ॐ महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥१५॥
ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट्‍ । ॐ तत्स० ह्रदयाय नमः ॥१६॥
ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा ।भर्गोदेवस्य शिखायै वौषट्‍ । धीमहि कवचाय हुं । धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट्‍ । प्रचोदयात अस्त्राय फट्‍ ॥१७॥
षडंगन्यास करोनि । अंगन्यास दशस्थानी । त्यांची नावे सांगेन कानी । एकचित्ते अवधारा ॥१८॥
पादजानुकटिस्थानी । नाभिह्रदयकंठभुवनी । तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी दशस्थान ॥१९॥
गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी । दशस्थान अंगन्यासासी । तत्सवितुर्वरेण्येसी । भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥
धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो सप्तम स्थान जाण । योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥२१॥
नकार नवम मंत्रस्थान । प्रचोदयात्‍ दहावे जाण । अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥२२॥
चतुर्विशति अक्षरांसी । करावे अंगन्यासासी । पादांगुष्ठस्पर्श हर्षी । शिखादारभ्य न्यासावे ॥२३॥
अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं गुल्फयोर्नमः । विं जंघर्योर्नमः । तुं जानुभ्यां नमः ॥२४॥
व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय नमः । णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां नमः ॥२५॥
भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः । दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय नमः ॥२६॥
स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो नमः । मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः ॥२७॥
धिं नेत्राभ्यां नमः । यों भ्रुवोर्मध्याय नमः । यों ललाटाय नमः । नः प्राङ्‍मुखाय नमः ॥२८॥
प्रं दक्षिणमुखाय नमः । चों पश्चिममुखाय नमः । दं उत्तरमुखाय नमः । यां मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट्‍ ॥२९॥
ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ठ धरोनि । कटिपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥
तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार गुल्फ असे स्थान । विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु ॥३१॥
तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार गुह्यपूर्वक स्पर्श । णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार कटिस्थान न्यास ॥३२॥
शिखा धरोनि पादपर्यंत । करावे न्यास उतरत । त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते परियेसा ॥३३॥
तं नमः शिकायै विन्यस्य । यां नमः मुर्ध्नि विन्यस्य । दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो नमः पश्चिमशिखायां ॥३४॥
प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः प्राङ्‍मुखे । यो नमः ललाटे । यो नमः भ्रुवोर्मध्यी ॥३५॥
धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः नासिकयोः । मं नमः तालौ । धी नमः दंतेषु ॥३६॥
स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये । दें नमः स्तनयोः । र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ ॥३७॥
प्रणवादि नमोत न्यास करावे । आकार नाभी उकार ह्रदये । मकार मुखे नकार ललाटे । मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥३८॥
अथ मुद्रासंपुटप्रकारी । चतुर्विशति अवधारी । सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥३९॥
श्लोक । सुमुखं संपुटं चैव विततं विस्तृतं तथा । द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥

षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥
प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम्‍ । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥
षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४१॥
प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम्‍ । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४२॥
शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥ ग्रंथितं ॥१४॥ चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं ॥१६॥
मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥ कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥
सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं ॥२२॥ मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥
मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ । या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥
गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित । समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥
या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि । भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप्‍ छंद ॥४६॥
द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि । रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥
गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी । विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥
भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी । म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४९॥
गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान । एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥
श्लोक । मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्‍ ।
गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥
ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी । अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥५२॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा । मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥५३॥
मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण । मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥५४॥
जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी । जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥५५॥
चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका । याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥५६॥
ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर । जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥५७॥
न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन । याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥
आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात । अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥५९॥
या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी । हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥
उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नकाळी । अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥६१॥
माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि । हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥६२॥
बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी । जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥६३॥
ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी । वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥
संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी । अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥६५॥
उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी । अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥६६॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी । म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥६७॥
पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥६८॥
अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण । शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥६९॥
स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक । पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥
कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला । जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥७१॥
गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली । सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥
जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु । प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥७३॥
गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश । सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥
अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता । करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥७५॥
महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी । जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥७६॥
जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे । शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥७७॥
द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी । चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥७८॥
कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले । श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥७९॥
ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी । स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥
दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी । संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥८१॥
जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी । क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥८२॥
मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी । तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥८३॥
नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री । अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥८४॥
ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण । ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥८५॥
गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि । उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥
शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती । गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी । गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥८८॥
ऐसी संध्या करून । मग करावे औपासन । सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥
साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी । मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक्‍ पृथक्‍ हेचि जाणा ॥४९०॥
न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य । स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥९१॥
कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी । वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥९२॥
व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय । मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥
फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी । काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥९४॥
ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी । समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥
समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका । होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥९६॥
साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर । गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥९७॥
साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण । अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥९८॥
घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी । तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥९९॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी । सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥
मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी । उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥१॥
उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी । प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥२॥
दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी । बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥३॥
उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी । म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥४॥
ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि । तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी । अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥६॥
तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी । नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥७॥
वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी । तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी । वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥९॥
एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री । जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥
देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि । मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥११॥
न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात । भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥१२॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी । विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी । ठेवो नये शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥१४॥
रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा । तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥१५॥
घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी । करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥१६॥
श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी । कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥१७॥
यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी । अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥१८॥
देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक । पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥१९॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक । सपत्‍नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥
देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी । कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥२१॥
आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी । षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥२२॥
अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी । आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥२३॥
जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण । मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥२४॥
पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण । श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥२५॥
निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी । दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥२६॥
अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी । यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥२७॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि । यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥२८॥
यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी । यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥२९॥
वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका । आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥
वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका । प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥३१॥
समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती । अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥३२॥
शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी । भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥३३॥
ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही । द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥३४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी । सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥३५॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार । वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥३६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत । वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्‍त्रिंशोऽध्यायः ॥३६॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । ओवीसंख्या ॥५३७॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु