शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (14:25 IST)

श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने

1) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
 
2) मनो वाक् काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळयात तेल घालून संभाळ करतो.
 
3) श्री पीठीकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्याह्न काळी भिक्षा स्विकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
 
4) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
 
5) (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
 
6) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
 
7) तुमचे अंत:करण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
 
8) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरुंची उपासना कराल ती मलाचप्राप्त होईल.
 
9) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
 
10) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
 
11) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिध्दपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
 
12) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.
 
#श्रीपादश्रीवल्लभचरित्रामृत 
 
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥