शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (10:22 IST)

धनतेरसला या 6 वस्तू विकत घेऊ नये, अशुभ असतं

धनतेरसचा दिवस धन, समृद्धी आणि सौख्यप्राप्तीसाठी शुभ आहे. या दिवशी काही विशेष धातूंच्या वस्तू विकत घेण्याचे महत्त्व आहे आणि ते चांगले मानले आहे. जेणे करून वर्षभर घरात बरकत राहते. 
 
पण काही अशा वस्तू आहे ज्यांना या शुभ दिवशी घरात आणू नये. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहे त्या 6 वस्तू -
 
1 स्टीलची भांडी - धनतेरसच्या दिवशी बरेच लोक स्टीलची भांडी विकत घेतात, हे चुकीचे आहे. या शुभदिनी कधी ही स्टीलची भांडी विकत घेऊ नये. स्टील हे राहूचे घटक आहे जे घरात आणू नये, हे शुभ नसतं. या दिवशी नैसर्गिक धातूंना शुभ मानले आहे, तर स्टील मानव निर्मित धातू आहे.
 
2 अल्युमिनियम - अल्युमिनियम वर देखील राहूचा प्रभाव असतो, म्हणून याला घरात आणणे आणि सजवून ठेवणं अशुभ आणि दुर्देवी मानले जाते. या शिवाय या मध्ये अन्न शिजवणे देखील शुभ मानले जात नाही. 
 
3 लोखंड - ज्योतिषात लोखंड हे शनीचे घटक मानले आहे, म्हणून या शुभ दिनी लोखंडच्या वस्तुंना घरात आणणे शुभ मानले जात नाही. धारदार शस्त्रे देखील या दिवशी आपल्याला घरात आणावयाचे नाही.
 
4 प्लास्टिक - धनतेरसच्या दिवशी प्लॅस्टिकच्या वस्तू विकत घेणं अशुभ मानतात, कारण या मुळे घरात स्थैर्यता आणि बरकत कमी होते. 
 
5 चिनी माती - या दिवशी चिनी मातीचा बनलेल्या वस्तू विकत घेणं देखील अशुभ मानतात. चिनी मातीच्या वस्तू बऱ्याच काळ सुरक्षित आणि स्थिर नसतात. म्हणून हे घरात बरकत कमी करतात.
 
6 काच - धनतेरसच्या शुभदिनी आपण काचेने बनलेल्या वस्तू विकत घेऊ नये. कारण काचेचा संबंध देखील राहूशी असतो, जे घरात शुभता कमी करतं.