रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (07:57 IST)

Dhanteras 2023: धनत्रयोदशी शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची विधी जाणून घ्या

Dhanteras 2023:दिवाळी किंवा दीपावली हा दिव्यांचा सण आहे. हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या महान सणाची वर्षभर प्रत्येकजण वाट पाहत असतात. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच कोणत्याही वस्तू खरेदीसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टी किंवा  मालमत्तेत तेरा पटींनी वाढ होते, असे मानले जाते. त्यामुळेच या दिवशी भांडी खरेदी करण्यासोबतच लोक सोने-चांदीच्या वस्तूही खरेदी करतात. कधी आहे धनत्रयोदशी जाणून घ्या.
 
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त 2023
त्रयोदशी तिथी प्रारंभ - 10 नोव्हेंबर 2023 दुपारी 12:35 पासून
त्रयोदशी तिथी समाप्त - 11 नोव्हेंबर 2023 दुपारी 01:57 पर्यंत
धनत्रयोदशी सण 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवारी रोजी साजरा केला जाईल.
 
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त: संध्याकाळी 05:46 ते 07:39 पर्यंत
संध्या पूजा: संध्याकाळी 05:31 ते संध्याकाळी 06:52 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:53 ते दुपारी 12:36 पर्यंत
विजय मुहूर्त: दुपारी 02:00 ते दुपारी 02:42 पर्यंत
तिन्हीसांज मुहूर्त: संध्याकाळी 05:31 ते 05:58 पर्यंत
अमृत काल: संध्याकाळी 05:35 ते 07:20 पर्यंत
टीप: वेळ स्थानिक वेळेनुसार बदलते.
 
खरेदीसाठी शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीला सोने, चांदी आणि भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त दुपारी 2:35 ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6:40 दरम्यान आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही यावेळी खरेदी करु शकत नसाल तर तुम्ही 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:40 ते दुपारी 1:57 दरम्यान वस्तू खरेदी करू शकता.
 
पूजा विधी -
धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करावी, सकाळी आंघोळ करावी व स्वच्छ कपडे परिधान करावेत. 
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात शुभ मुहूर्तावर कुबेर आणि धन्वंतरी देवाची मूर्ती उत्तर दिशेला बसवावी. 
तसेच लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर दिवा लावून विधिवत पूजा सुरू करावी.
सर्व देवांना तिलक लावावा. यानंतर फुले, फळे अर्पण करावे.
भगवान कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करा.
पूजेदरम्यान 'ओम ह्रीं कुबेराय नमः' या मंत्राचा जप करत राहा.
भगवान धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.
 
धनत्रयोदशीचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, कोषाध्यक्ष कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्यवस्थित पूजा केल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही
 
Edited by - Priya Dixit