गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

कसा साजरा करायचा पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळीचा दुसरा दिवस पाडवा. या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही पुण्याईमुळे श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली. असुर असून सुद्धा भगवंताचा शरणी गेला म्हणून देवाने त्याचे उद्धार केले.
 
या दिवशी विक्रम सवस्तर या कालगणनेच्या नव वर्षाचा प्रारंभ होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमदित्यानं विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली.
हा दिवस साजरा करण्याची पद्धत
वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी हा दिवस अर्ध्या मुहूर्ताचा समजला जातो म्हणून नव्या उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ असल्याचे मानले आहे.
या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात. काही लोकं शेणाचा पर्वत करून, श्रीकृष्ण, इंद्र, गायी- वासरे यांची चित्रे मांडून त्यांची पूजा करतात. गवळी आपल्या गायींना सजवून मिरवतात.
प्रतिपदा नर्ववर्षाची सुरुवात मानून व्यापारी वही पूजन करतात.
मुली- स्त्रिया तेल- उटणे लावून आपल्या वडिलांना आणि पतीला स्नान करवतात. नंतर त्यांना ओवाळतात.