शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (09:01 IST)

Diwali Padwa 2021 Wishes In Marathi दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2021

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, 
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
 
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
 
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना
आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी – दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
 
पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी
पूर्ण होवोत तुमच्या साऱ्या इच्छा, तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवाच्या लख्ख लख्ख शुभेच्छा..!
 
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे पवित्र पाडवा
उत्तम दिनाचे महात्म्य आहे सुखद ठरो पाडवा!
त्यात असू दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
 
आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
 
 
प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!
 
इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.