रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (10:12 IST)

दिवाळी स्पेशल बेसनाची बर्फी

साहित्य -
1 कप बेसन (हरभऱ्या डाळीचे पीठ), 3/4 कप वितळलेलं साजूक तूप, 5 चमचे रवा, 3/4 कप पिठी साखर, 1/2 चमचा वेलची पूड, 2 बदाम चुरी.
 
कृती -
कढईत तूप घालून गरम करा, त्या मध्ये हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि रवा घाला , चांगले ढवळा मध्यम आचे वर शिजवा. या मध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घाला . आणि चांगल्या प्रकारे ढवळत राहा. चांगला तांबूस रंग आल्यावर या मिश्रणाला एका ताटलीला तुपाचा हात लावून पसरवून घ्या.बदामाचे काप त्यावर टाकून हळुवार हाताने दाबा. आता एका सुरीने त्याचे समान 10 तुकडे करा. याला 2 तास तरी सेट होण्यासाठी ठेवून द्या. सेट झाल्यावर खाण्यासाठी मस्त अशी ही दिवाळी स्पेशल बेसनाची बर्फी सर्व्ह करा.